म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर व येथे काही टी. व्ही. मालिकेबरोबरच अनेक चित्रपटांचे चित्रीकरण सुरू होते. मार्च मध्ये करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर झाले, आणि सारेच पॅकअप झाले. मुंबई, पुण्यासह इतर अनेक भागातील कलाकार, तंत्रज्ञ परतले. तीन महिने चित्रीकरण बंद होते. मात्र गेल्या महिन्यात पुन्हा एकदा चित्रीकरण सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. अनेक निर्मात्यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली. कोल्हापुरात चित्रीकरण सुरू होण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुढाकार घेतला. याला आता यश मिळाले आहे. येत्या २२ जून पासून कोल्हापुरात पुन्हा एकदा लाइट.. ॲक्शन अन कॅमेरा असा आवाज घुमणार आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेचे कलाकार, तंत्रज्ञ तेरा दिवसापूर्वीच कोल्हापुरात दाखल झाले आहेत. आल्यानंतर त्यांचे स्वॅब घेण्यात आले असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यांना १४ दिवस संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. दोन दिवसानंतर मुदत संपताच चित्रीकरण सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये राणा अर्थात हार्दिक जोशी व पाठकबाई अर्थात अक्षया देवधर यांच्यासह इतर प्रमुख कलाकार कोल्हापुरात आले आहेत. सुरक्षित वावर चे सर्व नियम पाळून हे चित्रीकरण करण्यात येणार आहे. यामुळे आठ ते दहा दिवसानंतर या मालिकेचा नवा भाग पहायला मिळण्याची शक्यता आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fGif96