Full Width(True/False)

'हेराफेरी ३' संदर्भात दिग्दर्शकांनी केला 'हा' खुलासा

मुंबई :'देवीप्रसाद घर पर है?' हा प्रश्न, राँग नंबर म्हणून येणारे फोन, मराठमोळे बाबूभय्या, लहान मुलीचं अपहरण आणि मग सुरू झालेली एक कथा. 'हेराफेरी' हा धमाल तुम्हाला आठवत असेल. आजही हा चित्रपट चॅनलवर लागला तर आवडीनं पाहिला जातो. त्यानंतर 'फिर ' हा त्याचा दुसरा भाग आला होता. त्याला पहिल्या चित्रपटाइतकं यश मिळालं नाही. आता लवकरच 'हेराफेरी'चा तिसरा भाग येण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक प्रियदर्शनच्या म्हणण्यानुसार हा अंदाज बांधला जाऊ लागला आहे. 'अक्षयकुमारबरोबर एक विनोदी सिनेमा करणार आहे. पुढच्या वर्षी त्याचं शूटिंग सुरू होईल,' असं दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी सांगितलं. तसंच ''बाबत त्यातले कलाकार आणि निर्माते यांच्याशी बोलणं सुरू असल्यांचंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे या दोन्ही वाक्यांचा एकच संबंध आहे असं समजून 'हेराफेरी ३' आता लवकरच येईल अशी शक्यता आहे. या सिनेमाविषयी प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता असेल. सिनेमाची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. सिनेमाचे दिग्दर्शक, कलाकार बदलणार अशीही चर्चा होती. पण आता तसं काही दिसत नाही. अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी या तिघांनाच घेऊन सिनेमाचा तिसरा भाग केला जाईल आणि त्यांच्या वयाला साजेशा त्यांच्या भूमिका असतील, असं दिग्दर्शकानं याआधी सांगितलं होतं. या बहुचर्चित सिनेमाविषयी इतक्या गोष्टी नव्यानं कळल्यामुळे त्याच्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mkdMgl