Full Width(True/False)

सुशांतसिंह माझ्याच पोटी जन्म घेणार- राखी सावंत

मुंबई- एकीकडे सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या बातमीतून अनेकजण अजूनही सावरले नाहीत. यातच राखी सावंतने दावा केला की सुशांतचा पुनर्जन्म होणार असून तो तिच्याच पोटी जन्माला येणार आहे. स्वतः राखीने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला. राखी या व्हिडिओमध्ये म्हणते की, रात्री तिच्या स्वप्नात सुशांत आला होता आणि त्याने पुनर्जन्म घेण्याबद्दल सांगितलं. रात्री मी झोपले होते तेव्हा जोरात धक्का बसला. मी घाबरून विचारलं कोण आहे? तर आवाज आला मी सुशांत.. तुम्ही विश्वास करू शकता का की माझ्या स्वप्नात सुशांत आला होता. त्याने सांगितलं की तो पुनर्जन्म घेणार आहे. मी त्याला विचारलं कसं? तर तो म्हणाला की मी ते लवकरच सांगेन. तेव्हा मी त्याला आताच सांगण्याचा आग्रह केला. त्यावर सुशांत म्हणाला की, 'राखी तू लग्न करशील आणि मी तुझ्या पोटी जन्म घेईन.' राखी सावंतचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना फारसा आवडला नाही. त्यांनी सोशल मीडियावर तिची कानउघडणी केली. राखी तू आमच्या नजरेतून उतरलीस असंही अनेकांनी कमेन्ट केली. सुशांतसिंह राजपूतने १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. गेल्या काही महिन्यांपासून तो नैराश्यात असल्याचं म्हटलं जात होतं. नैराश्यावर तो उपचारही घेत होता. सुशांतच्या कुटुंबियांनी यासंबंधी सीबीआयकडे चौकशी व्हावी अशी मागणी केली. मुंबई पोलिसांनीही याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तीन वेगवेगळ्या टीम तयार केल्या आहेत. त्यामुळे जसजशी चौकशी पुढे जाईल त्याप्रमाणे अनेक खुलासे होतील. सोशल मीडियावर ट्रोल होतेय सोनाक्षी- दरम्यान, सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटींना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. सोनाक्षी सिन्हाचंही यात नाव आहे. लोकांच्यामते, सोनाक्षीसारख्या स्टार किड्समुळे बॉलिवूडमध्ये चांगल्या लोकांना कामं मिळत नाहीत असा आरोप करण्यात आला. प्रतिभावान लोकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे आणि सोनाक्षीसारख्या लोकांना काम दिलं जात आहे. बॉलिवूड माफिया म्हटल्या जाणाऱ्यांचं सोनाक्षीने केलं होतं समर्थन- ज्या लोकांना बॉलिवूड माफिया म्हटलं जात होतं त्या सर्वांचं सोनाक्षीने समर्थन केलं. सोनाक्षी म्हणाली की, काही लोक सुशांतच्या मृत्यूची पब्लिसिटी करत आहेत. यावेळी सोनाक्षीने ट्रोल करणाऱ्यांची कठोर शब्दात निंदा केली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Nin3VN