मुंबई: बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध असलेली मराठीमोळी अभिनेत्री हिनं नुकताच तिच्या लग्नाचा १७वा वाढदिवस साजरा केला. या निमित्तानं तिनं काही फोटो शेअर केले आहेत. लग्नाच्या दिवशीचे गृहप्रवेशाचे फोटो अमृतानं शेअर केले आहेत. 'आज लग्नाला १७ वर्षं झाली. पुढच्या फोटोत मी संदेशला पेढा भरवत असताना मागे उभ्या असलेल्या दोन्ही बाबांच्या चेहऱ्यावरचे भाव अमूल्य आहेत. मी माप ओलांडताना संदेश माझ्या पाठीशी उभा आहे तो आजतागायत. कृतज्ञ', असं म्हणत तिनं भावना व्यक्त केल्यात. तसंच पती संदेश यांनी जी साथ दिली आहे त्याबद्दल त्यांचे आभारही मानले आहेत. खूप कमी जणांना अमृता आणि यांच्या लव्हस्टोरी विषयी माहिती असेल. अमृता जेव्हा सतरा वर्षाची होती तेव्हा ती संदेशच्या प्रेमात पडली होती. संदेश म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णाचा भाऊ. पहिल्या भेटीविषयी अमृता सांगते की, सोनालीच्या वाढदिवसाला तिला शुभेच्छा देण्यासाठी मी तिच्या घरी गेली होते. तिथं मला सर्वात आधी तिचा भाऊ, संदेश दिसला. आजही मला तो तस्साच्या तसा आठवतो, त्यानं कुर्ता घातला होता, त्याच्या बाह्या दुमडल्या होत्या आणि तो कुठंतरी निघाला होता.. त्याला तसा पाहिल्यानंतर माझा आतला आवाज मला स्पष्ट ऐकू आला. 'हाच माझा नवरा' असं तिनं एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. संदेश देखील सिनेसृष्टीचाच भाग असल्यानं दोघंही एकमेकांना समजून घेतात. अमृताचा सध्या बॉलिवूडमध्येही बोलबाला असल्याचं पाहायला मिळतं. त्याविषयी ती म्हणते की,गेलं वर्ष एक अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी खूप खास होतं. 'सेक्रेड गेम्स', 'गली बॉय'मधल्या माझ्या अभिनयाचं भरभरून कौतुक झालं. एका कलाकाराला आणखी काय हवं असतं? 'फिल्मफेअर'सारखा मानाचा पुरस्कार एकदा तरी आपला व्हावा असं स्वप्न होतं. ते 'गली बॉय'च्या निमित्तानं पूर्ण झालं. फिल्मफेअरच्या कव्हरपेजवर आपला फोटो येणं हे माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. यापूर्वी देखील मी बॉलिवूडमध्ये काम केलं आहे. परंतु, आता 'सेक्रेड गेम्स', 'गली बॉय', 'चोक्ड'नं मला आत्मविश्वास दिलाय की, आपण अधिक चांगलं काम करू शकतो. सुरुवातीला बॉलिवूडमध्ये वावरताना मी स्वत:ला चाचपून पाहत होते. आपल्याला ते स्वीकारतील की नाही, अशी थोडी भीतीही मनात होती. पण, म्हणतात ना आपण आपल्या कामाप्रती प्रामाणिक असल्यावर समोरच्यालादेखील ते दिसतं. आज माझ्या हिंदीतील प्रत्येक प्रोजेक्टचं कौतुक होतंय हे पाहून अभिनेत्री म्हणून मला आणखी हुरुप आला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3g5F9XB