Full Width(True/False)

चीनी अॅप्स का बंद केले?, आता युजर्स काय करणार?

नवी दिल्लीः भारत सरकारने ५० हून अधिक चीनी अॅप्स बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला. बंदी घालण्यात आलेल्या अॅप्सच्या यादीत प्रसिद्ध अॅप्सचा समावेश आहे. यात , आणि ShareIt यासारख्या प्रसिद्ध अॅप्सचा समावेश आहे. या अॅप्सवर बंदी घालण्यामागे केवळ हे अॅप्स चीनी अॅप्स आहेत. म्हणून त्यांच्यावर बंदीवर घातली नाही. देशाची सुरक्षा आणि एकता राखून ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे. त्यामुळे लवकरच ५९ अॅप्स गुगल प्ले स्टोर आणि अॅपल प्ले स्टोरवरून हटवण्यात येतील. वाचाः भारत-चीन सीमेवर गेल्या काही दिवसांपासून तणाव दिसत आहे. १५ जून रोजी गलवान खोऱ्यात भारताचे २० जवान शहीद झाले. त्यानंतर चायनीज अॅप्स आणि सामानावर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू करण्यात आली. या अॅप्सवर बंदी घालण्याचे कारण, माहिती व तंत्रज्ञान प्रसारण मंत्रालयाने सांगितले. यात सांगितले की, वेगवेगळ्या सोर्सवरून या अॅप्स संबंधी तक्रारी मिळत होत्या. अनेक रिपोर्ट्स युजर्सचा डेटाचा चुकीचा वापर करण्याची शक्यता समोर आली होती. अधिकृत स्टेटमेंटच्या माहितीनुसार, अँड्रॉयड आणि iOS प्लॅटफॉर्म्स वरून युजर्सचा डेटा चोरी करण्यासाठी आणि भारताच्या बाहेर त्याचा चुकीचा वापर करण्यासाठी या डेटाचा वापर केला जात असल्याची माहिती समोर आली होती. डेटा चोरीच्या तक्रारीनंतर भारताची राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला होता. भारताची एकता आणि अखंडतेला नुकसान पोहोचवण्याचा असा प्रयत्न सुरू होता. त्यामुळे या अॅप्सच्या विरोधात तात्काळ कारवाई करणे गरजेचे होते, असे मंत्रालयाने म्हटले आहे. मोठ्या नावाचा समावेश चायनीज अॅप्सवर माहिती तंत्रज्ञान अॅक्टच्या ६९ ए सेक्शन आणि माहिती तंत्रज्ञान आणि नियम २००९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या अॅप्सच्या यादीत प्रसिद्ध टिकटॉक, शेयरइट, यूजी ब्राउजर, बायदू मॅप, हेलो, लाइक, मी कम्युनिटी, क्लब फॅक्ट्री, यूसी न्यूज, वीबो, मी विडियो कॉल-शाओमी, वीवो विडियो, क्लीन मास्टर आणि कॅम स्कनर या अॅप्सचा समावेश आहे. आता युजर्स काय करणार ? भारताच्या सायबर स्पेसची सुरक्षा त्याची जबाबदारी आहे. ज्यात भारतातील मोबाइल आणि इंटरनेट युजर्सला कोणत्याही नुकसानापासून वाचवले जाऊ शकते. युजर्संना आणखी चांगले पर्याय या बंदीनंतर देणे गरजेचे आहे. बंदी घालण्यात आलेल्या अॅप्सना प्ले स्टोर आणि अॅप स्टोरवरून हटवले जाईल. ज्या मोबाइलमध्ये सध्या हे अॅप्स आहेत. सध्या युजर्स त्यांचा वापर करु शकतात. परंतु, त्यानंतर त्याला ब्लॉक करण्यात येऊ शकते. त्यामुळे युजर्संना असेच फीचर्स ऑफर करणारे दुसऱ्या अॅप्सवर स्विच करण्याचा सल्ला दिला गेला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YHXROY