Full Width(True/False)

आसाम-मिझोराम सीमेवर पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर जखमी; बहिण उर्मिलानं दिली प्रकृतीची माहिती

मुंबई: ईशान्येकडील आसाम आणि मिझोरम या राज्यांमधील सीमासंघर्ष सोमवारी अधिकच चिघळला. आसामच्या सीमेवरील कचार जिल्ह्यात उडालेल्या चकमकीत आसाम पोलिस दलातील सहा पोलिस हुतात्मा झाले. यात अनेक पोलिस शिपाई आणि मूळचे महाराष्टातील असलेले अधिकारी हे देखील यामध्ये जखमी झाले आहेत. निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागली आहे. वैभव निंबाळकर हे अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिचे भाऊ आहेत. उर्मिलानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन वैभव निंबाळकर यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. माझा भाऊ, आयपीएस वैभव निंबाळकर कर्तव्यावर गोळीबार आणि दगडफेकीत जखमी झाला आहे. त्याची प्रकृती स्थीर असून तो सध्या आयसीयूत आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.अशी माहिती उर्मिलानं तिच्या पोस्टमधून दिली आहे. तसंच विचारपूस केल्याबद्दल हितचिंतकांचे तिने आभारही मानले आहेत. काय घडलं आहे नेमकं?आसाम आणि मिझोरम या राज्यांमधील सीमासंघर्ष अधिकच चिघळल्याचं पाहायला मिळत आहे. सीमेवर झालेल्या गोळीबारात सहा पोलिस शहीद झालेत. दोन्ही बाजूंमधील मतभेद मिटवण्यासाठी नागरी अधिकारी चर्चा करत असताना, मिझोरमच्या हद्दीतून काही समाजकंटकांनी गोळीबार आणि दगडफेक सुरू केल्याची माहिती सोमवारी संध्याकाळी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. हा अधिकारी सोमवारी उशिरापर्यंत जंगलातच होता. या हिंसाचारात कचरचे पोलिस अधीक्षक वैभव निंबाळकर यांच्यासह किमान ५० पोलिस जखमी झाल्याची माहितीही या अधिकाऱ्याने दिली. या संघर्षानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा आणि मिझोरमचे मुख्यमंत्री झोरामतंगा यांनी एकमेकांच्या पोलिसांवर दोषारोप केले आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3x2zzgx