Full Width(True/False)

येतोय, सॅमसंगचा जबरदस्त फोन, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन येत आहे. सॅमसंगचा हा आहे. अनेक रिपोर्ट्समधून हा दावा करण्यात आला आहे की, या महिन्यात भारतात या स्मार्टफोनला लाँच करण्यात येणार आहे. आता सॅमसंग इंडियाने सुद्धा एक ट्विट केले आहे. या ट्विटमधून गॅलेक्सी A21s ची लाँचिंग डेट कन्फर्म केली आहे. हा स्मार्टफोन १७ जून रोजी भारतात लाँच करण्यात येणार आहे. सॅमसंग हा स्मार्टफोन या वर्षी आलेल्या Galaxy A21 चे अपडेटेड व्हर्जन आहे. हा स्मार्टफोन गॅलेक्सी ए सीरिज अंतर्गत येत आहे. दमदार बॅटरी आणि पंचहोल डिस्प्ले सोबत येणार फोन सॅमसंग इंडियाने ट्विटरवर १३ सेकंदाचा एक टीझर व्हिडिओ रिलीज केला आहे. ज्यात Galaxy A21s दिसतो. तसेच लाँचिंग तारखेचाही खुलासा करण्यात आला आहे. सॅमसंगचा हा फोन दमदार बॅटरी आणि पंचहोल डिस्प्ले सोबत येईल. या स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये आधीच लीक झाली आहेत. हा फोन गेल्या महिन्यात युरोपमध्ये लाँच करण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी A21s स्मार्टफोन २०० यूरो म्हणजेच १७ हजार १०० रुपये किंमतीत युरोपमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनचे वैशिष्ट्ये युरोपमध्ये लाँच झालेल्या सॅमसंग Galaxy A21s स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू आणि व्हाईट कलरमध्ये आले. या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा HD+ infinity-O डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 720X1,600 पिक्सल आहे. सॅमसंगचा हा फोन One UI सोबत अँड्रॉयड 10 वर चालतो. स्मार्टफोनमध्ये ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकतो. फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी दिली आहे. 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा - वाइड कॅमेरा दिला आहे. तसेच फोनमध्ये २-२ मेगापिक्सलचे २ कॅमेरे दिले आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फी साठी फोनमध्ये फ्रंटला १३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3e31vYZ