Full Width(True/False)

दगडाच्या काळजाची आहेस; क्रिती सॅननवर नेटकरी भडकले

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या अकाली एक्सीटमुळं त्याच्या चाहत्यांसाहीत अवघ्या सिनेसृष्टीला धक्का बसला असून अनेक सेलिब्रिटींनी सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याच्या सहकलाकारांनी सोशल मीडियावर त्याच्यासोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत. असं असताना ज्यांच्यासोबत सुशांतचं नाव जोडलं गेलं होतं. त्या अभिनेत्रींनी मात्र त्याच्या आत्महत्येवर अद्यापही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळं सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुशांतचं नाव रिया चक्रवर्ती हिच्यासोबत जोडण्यात येत होतं. परंतु सुशांतच्या आत्महत्येवर तिनं अद्यापही कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. रियापूर्वी सुशांतचं नाव अभिनेत्री क्रिती सनन हिच्यासोबत जोडण्यात आलं होतं. परंतु दोक्रिती सॅननघांनीही कधीही त्यांच्या नात्याला दुजोरा दिला नव्हता. असं असलं तरी सुशांतच्या निधनावर क्रितीनं देखील गप्प आहे. सोशल मीडियावर देखील काही शेअर केलं नाहीए. त्यामुळं सुशांतचे चाहते आणि नेटकऱ्यांनी क्रितीवर टीका केली आहे. या टीकेला किर्तीच्या बहिणीनं सोशल मीडियावर एक पोस्ट करत उत्तर दिलं आहे. नुपूर सॅनन हिनं एक पोस्ट शेअर केलीए. 'कालपासून अनेकजण सोशल मीडियावर मानसिक आरोग्य आणि डिप्रेशन याबद्दल बोलत आहेत. तर अनेक जण दुखावलेल्या आणि धक्क्यातून न सावरू शकेलेल्या व्यक्तींना इन्स्टाग्रामवर फोटो शेअर न केल्यामुळं त्रास देताय, टीका करतायत.', असं नुपूरनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 'तू किती निर्दयी आहेस एक पोस्ट देखील शेअर करू शकत नाहीस. तुझं दगडाचं काळीज आहे', अशा प्रकारचे मेसेज आम्हाला कालपासून येत आहेत' असंही नुपूरनं म्हटलं आहे. तुमची परवानगी असेल तर आम्ही रडू का? असंही तिनं पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे. दरम्यान, नुपूरनं सुशातं सोबत एक फोटो शेअर करत त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे. एका हिलस्टेशनवरचा हा फोटो आहे. यात दोघंही आनंदी दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना नुपूरनं 'नग़मे हैं ,शिकवे हैं ,किस्से हैं ,बातें हैं ...'असं म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30HXQfx