Full Width(True/False)

Live Update: विलेपार्ले येथे होणार सुशांतसिंह राजपूतवर अंत्यसंस्कार

Live Update मुंबई- सुशांतसिंह राजपूतवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारांवेळी त्याच्या कुटुंबासोबत बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटीही उपस्थित होते. यावेळी रिया चक्रवर्ती, क्रिती सेनॉन, विवेक ओबेरॉय स्मशानभूमीत उपस्थित होते. विलेपार्लेतील पवनहंस स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुशांतसिंह राजपुतच्या आत्महत्येमुळे संपूर्ण देशात दुःखाची लाट पसरली आहे. ३४ वर्षीय सुशांतने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची पोलीस चौकशी करत असून यासंबंधी अनेकांची चौकशी सुरू केली आहे. त्याचं संपूर्ण कुटुंब पटणावरून मुंबईत दाखल झालं. सुशांतच्या मॅनेजरला त्याच्या फोनचा पासवर्ड माहीत होता. याच्या मदतीने पोलिसांनी त्याने शेवटचा फोन कोणाला केला याचा शोध घेतला. यात त्याचा मित्र महेश कृष्णा शेट्टीला सुशांतने रात्री ३ वाजता फोन केला होता. पण महेश फोन उचलू शकला नाही. यानंतर त्याने सकाळी बहिणीला फोन केला होता. बहिणीशी त्याने थोडावेळ बोलला. महेशने दुपारी १२ वाजता सुशांतला फोन केला होता. पण तोवर त्याने आत्महत्या केली होती. दरम्यान, रविवारी रात्री सुशांतच्या कुटुंबियांचे विमानतळावरील फोटो समोर आले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सुशांतला गमावल्याचं दुःख स्पष्टपणे दिसत होतं. वडील आणि बहिणींसाठी याहून वाईट दिवस कोणताच नसेल जेव्हा एका- एका क्षणाने त्यांना फक्त दुःख आणि वेदना दिल्या. अनेक दिवसांपासून सुशांतला एकटेपणा जाणवत होता आणि घरच्यांना तो स्वतःसोबत राहण्यासाठी बोलावत होता. काही दिवसांननी त्याचे बाबा त्याच्यासोबत रहायला येणार होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3d52VB9