Full Width(True/False)

'मराठीतही स्वयंघोषीत कलाकारांची मक्तेदारी आहे'

मुंबई- बॉलिवूड अभिनेता च्या आत्महत्येनंतर घराणेशाहीच्या मुद्द्याने पुन्हा डोकं वर काढलं. अभिनेत्री कंगना रणौतने पुढे येऊन बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांची नावं घेतली. मराठीतही अशाचप्रकारची चालते असा गौप्यस्फोट निर्माते दिग्दर्शक यांनी केला. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी अनेक गंभीर मुद्द्यांना हात घातला आहे. १२ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये टिळेकरांनी मराठी सिनेसृष्टीतही मोठ्या प्रमाणात गटबाजी असल्याचं सांगितलं. एखादा नवखा कलाकार चांगलं काम करत असेल तर त्याचे पाय खेचून त्याला खाली ओढले जात असल्याचं सांगितलं. मराठी सिनेसृष्टीत अनेकांना त्यांच्यामुळेच सिनेसृष्टी चालते असा एक भ्रम आहे आणि ते याच भ्रमात जगत असतात. अशी मंडळी समोरून कधीच वार न करता पडद्यामागे राहून कसा काटा काढता येईल ते पाहत असतात, असंही महेश टिळेकर म्हणाले. 'सिनेसृष्टीत सारेच वाईट आहेत असं नाही. २० टक्के लोक चांगलेही आहेत. पण उरलेली सारीच गटबाजी करून वावरतात. सिनेमांपासून पुरस्कारांपर्यंत त्या कलाकारांचाच उदोउदो केला जातो. मराठी सिनेसृष्टी ही एखाद्या कुटुंबाप्रमाणे असल्याचं म्हटलं जातं. पण असं काही नाही. इथेही बॉलिवूडप्रमाणेच नवोदितांचे पाय खेचले जातात.' पुढे आपल्या अनुभवाबद्दल सांगताना टिळेकर म्हणाले की, 'मलाही अनेकांनी त्रास दिला. माझं काम कसं बंद पडेल आणि मी कसा अपयशी होईन याच्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सुरुवातीला मला याचा प्रचंड मानसिक त्रास झाला. पण अखेर मी या सगळ्यांना पुरून उरलो. मी सहसा कोणाच्याही वाट्याला जात नाही. पण कोणी माझ्या वाट्याला गेलं तर मी मात्र सहन करत नाही. जशाला तसंच उत्तर देतो.' 'मी सिनेमा पाहून झाल्यावर अनेकांना त्यांच्या कामाचं कौतुक करणारे फोन करायचो. पण माझ्या मराठी तारका कार्यक्रमाचे एकाही कलाकाराने कौतुक केलं नाही. सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली की कलाकार अनाथाश्रमात जाऊन खोटं रडतात. विशेष म्हणजे ते रडल्याचीही प्रसिद्धी केली जाते. पण माझ्या सिनेमांचं किंवा इतर कार्यक्रमांचं कोणी कधी कौतुक केलं नाही.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3esrolv