Full Width(True/False)

ऑडिशनच्या वेळी दिले होते सतरा टेक; स्नेहा वाघनं सांगितल्या 'ज्योती'च्या आठवणी

मुंबई : अकरा वर्षांपूर्वी, अर्थात २००९ मध्ये लोकप्रियअसलेली हिंदी मालिका 'ज्योती' सध्या पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आपल्या कुटुंबाच्या आणि कुटुंबियांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या स्वप्नांना मुरड घालणाऱ्या एका मुलीची ही गोष्ट होती. मालिकेबाबतच्या अनेक जुन्या आठवणींनी प्रेक्षकांबरोबरच या मालिकेतल्या कलाकारांच्या काही आठवणीदेखील ताज्या झाल्या आहेत. मालिकेत अभिनेत्री या अभिनेत्रीनं शीर्षक भूमिका साकारली होती. मालिकेचे निर्माते तब्बल सहा महिने मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्रीच्या शोधात होते. परंतु, ज्योतीच्या भूमिकेत चपखल बसेल अशी कोणी अभिनेत्री त्यांना सापडत नव्हती. पण, शेवटी स्नेहा वाघच्या रुपानं ती मिळाल्याचं निर्माते सांगतात. मालिकेच्या जुन्या आठवणींविषयी स्नेहा सांगते की, 'मी मराठी मनोरंजनसृष्टीत काम करत होते. 'ज्योती' ही माझी पहिलीच हिंदी मालिका. मला जेव्हा ऑडिशनसाठी बोलावलं गेलं; तेव्हा मी थोडी घाबरले होते. ऑडिशनच्या दिवशी रात्रीचे अकरा वाजले होते आणि माझ्या ऑडिशन सुरूच होत्या. मी थोडीशी हताश झाले होते. तब्बल सतरा टेक मी ऑडिशनच्या वेळी दिले. त्यामुळे मला वाटतं होतं की, आता ही भूमिका मला मिळणार नाही. पण सात दिवसांनी निर्मात्यांचा फोन आला आणि माझी मुख्य भूमिकेसाठी निवड झाल्याचं त्यांनी सांगितलं.' आज दहा वर्षांनंतर देखील मालिकेतील सर्व कलाकार एकमेकांच्या संपर्कात असल्याचं देखील स्नेहानं सांगितलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2CasbZN