Full Width(True/False)

सुशांतसाठी श्वेताने मला ५ वेळा सोडलं, भावोजीने केला खुलासा

मुंबई- सुशांतसिंह राजपूतचे भावोजी अमेरिकेत राहतात. त्यांनी नुकताच एक ब्लॉग लिहिला. या ब्लॉगमध्ये त्यांनी लिहिले की त्यांच्या पत्नीने अर्थात सुशांतच्या बहिणीने श्वेतासिंह किर्तीने सुशांतसोबत राहण्यासाठी त्यांना पाच वेळा सोडून भारतात आली. रिया चक्रवर्तीने राजपूत कुटुंबावर आरोप करत ते सुशांतच्या संपर्कात नसल्याचं म्हटलं होतं. यावर सुशांतच्या बहिणींनी अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअरही केले होते. चमकणारा तारा निघून गेला विशालसिंह यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की. त्यांची पत्नी श्वेता त्यांना सोडून गेल्याचं त्यांना कधीच दुःख नव्हतं. याउलट राजपूत कुटुंबियांचं एकमेकांसाठी असलेल्या प्रेमाचं त्यांना कौतुक वाटतं. उलट विशाल यांना याचंच दुःख आहे की श्वेता आता अशा अचानक ट्रीप करून कधीच जाऊ शकणार नाही. कारण त्यांनी कुटुंबातील चमकता तारा गमावला आहे. लग्नाच्या वाढदिवसाला केला होता एकत्र डान्स विशालने या ब्लॉगमध्ये लिहिले की, २०१४ मध्ये आम्ही उन्हाळ्यात भारतात येणार होतो. पण जेव्हा श्वेताला समजलम की राणी दीच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्याला सुशांतही येणार आहे तिने उन्हाळ्याची तिकीटं रद्द केली आणि ती आधीच भारतात निघून गेली. फक्त तीन दिवसांसाठी भारतात आलेली श्वेता २०१५ मध्ये श्वेता सुशांतला भेटण्यासाठी फक्त तीन दिवसांसाठी भारतात आली होती. मुलाला घेऊन तिने थेट रांची गाठलं होतं. तेव्हा सुशांत एम.एस. धोनी सिनेमाचं चित्रीकरण करत होता. २०१६ मध्ये संपूर्ण कुटुंबाने एम.एस. धोनी सिनेमा पाहण्याचा निर्णय घेतला तेव्हा फक्त तीन दिवसांसाठी श्वेता भारतात आली होती. या तीन दिवसांसाठी तिने २ दिवस फ्लाइटमध्येच घालवले होते. २०२० मध्ये दोघांनाही भेटता आलं नाही २०१७ मध्ये ती मला सोडून गेली नाही. यावेळी आम्ही सर्वजण सुशांतसोबत फिरलो. जानेवारी २०२० मध्ये, पुन्हा एकदा ती भारतात गेली, यावेळीही मी तिच्यासोबत नव्हतो. ती सुशांतसोबत राहण्यासाठी चंदीगडला गेली होती. पण तो अशा परिस्थितीत होता की ती त्याला भेटू शकली नाही. का ते तर साऱ्यांनाच माहीत आहे. नंतर कोविडच्या काळात १४ जूनची बातमी कळताच भावाला अखेरचा निरोप देण्यासाठी ती जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर भारतात गेली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32ZrpbI