Full Width(True/False)

स्टारकिड असतो तर बॉलिवूडमध्ये लवकर लाँच झालो असतो : आयुष्यमान खुराना

मुंबई: अभिनेता याच्या आत्महत्येमुळं गेले काही दिवस स्टारकिड्सना मिळणारं काम आणि बाहेरून येणाऱ्या कलाकारांना करावा लागणारा संघर्ष, घराणेशाही वगैरे विषयांवरची चर्चा जोर धरू लागली आहे. यावर अनेक कलाकारांनी त्यांची मतं व्यक्त केली आहेत. अभिनेता आयुष्यमान खुराना यानं दोन वर्षापूर्वी दिलेली एक मुलाखत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘स्टारकिड असतो, तर केव्हाच या क्षेत्रात पर्दापण करता आलं असतं,’ असं मत त्यानं मांडलं होतं. २०१२ मध्ये ‘विकी डोनर’सारख्या ऑफबीट विषयावर आधारित चित्रपटातून या क्षेत्रात येणारा आयुष्यमान आज अशा वेगळ्या प्रकारचे विषय हाताळणाऱ्या चित्रपटांचा हिरो मानला जातो. मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर आज त्यानं आपलं स्थान निर्माण केलेलं असलं, तरी इथपर्यंतचा रस्ता त्याच्यासाठी सोपा नव्हता. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत आयुष्यमाननं बॉलिवूडमधल्या भेदभावावर खुलेपणानं प्रतिक्रिया दिली होती. आयुष्यमान म्हणाला होता की, ‘प्रत्येक ठिकाणी भेदभाव असतो. उद्योजकाच्या मुलाला उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. समजा माझ्या मुलात गुणवत्ता असेल, तर मी एका चित्रपटाद्वारे त्याला लाँच करेन. अर्थात शेवटी गुणवत्ताच महत्त्वाची ठरते.’तो पुढं म्हणाला होता की, ‘आलिया भट्ट, वरुण धवन, रणबीर कपूर गुणवान आहेत. त्यांना फक्त स्टार किड्स असल्यामुळं चित्रपट मिळतात असं नाही. त्यांना लवकर संधी मिळते, हेही तितकंच खरं. ‘विकी डोनर’ चित्रपट मिळाला, तेव्हा मी २७ वर्षांचा होतो. स्टार किड असतो, तर २२ किंवा २३ व्या वर्षीच मला लाँच केलं गेलं असतं.’ यामुळं करिअरचा अमूल्य वेळ वाया जातो, असंही आयुष्यमान म्हणाला होता. दरम्यान, आयुष्यानचा 'गुलाबो, सिताबो' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला असून या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता . होती. आयुष्मान म्हणाला की, 'गुलाबो सिताबो' सिनेमा माझ्यासाठी फार खास आहे. या चित्रपटात मी शूजीत दासोबत पुन्हा एकदा काम करू शकलो. विकी डोनरनंतर आम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करत असल्याचा आनंद आहेच. आज मी जो आहे तो फक्त त्यांच्यामुळंच आहे. त्यांनी या सिनेमासाठी माझी निवड केली याचा मला आनंद आहे. याशिवाय या सिनेमात मी पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करत आहे. हे माझ्यासाठी स्वप्न खरं होण्यासारखं आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची माझी अनेक वर्षांची इच्छा होती. हे स्वप्नही शूजीत दानेच पूर्ण केलं.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ih9hBg