Full Width(True/False)

सुशांतच्या मृत्यूचं गूढ; मृतदेह एका बाजूला झुकलेला होता

मुंबई- अभिनेता ने १४ जून रोजी गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी मुंबई पोलीस आवश्यक त्या सर्व गोष्टींची तपासणी करत आहे. याप्रकरणी प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले की, सुशांतचा मृतदेह झुकलेल्या अवस्थेत होता. रिपोर्टनुसार, पोलिसांनी जेव्हा पंचनामा केला तेव्हा अनेक गोष्टी समोर आल्या. सुशांतच्या बेडपासून पंख्याच्या मोटरची उंची ५ फूट ११ इंच होती आणि मृतदेह एका बाजूला कलंडलेलं होतं. यानंतर पोलिसांनी पंख्यापासून सुशांतच्या उंचीच माप घेतलं जे ८ फूट १ इंच होतं. यात पोलिसांना कोणताही फाउल प्ले दिसला नाही. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, शरीरावर हातापायीचे कोणतेही निशाण मिळाले नाहीत. तसेच शरीराचं कलंडलेपण स्पष्ट दाखवत होतं की मृत्यू गळफास लावूनच झाला होता. दरम्यान, सुशांतने काही विषारी गोष्ट खाल्ली नव्हती ना याचा तपास फॉरेन्सिक लॅब करत आहे. त्याचा अहवाल येणं अजून बाकी आहे. डीसीपी अभिषेक त्रिमूखे यांनी सांगितलं की, सुशांतच्या आत्महत्ये संदर्भात आतापर्यंत २७ लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. वांद्रे पोलिसांना कुपर इस्पितळाने शेवटचा शवविच्छेदनाचा अहवालही दिला आहे. यात सुशांतच्या मृत्यूचे कारण Asphyxia due to hanging सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी जे पुरावे गोळा केले ते सर्व फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आल्याचंही त्रिमुखे म्हणाले. यासोबतच सुशांतने आत्महत्या का केली यासंदर्भात कसून तपास केला जात आहे. मात्र या काळात सोशल मीडियावर त्याच्या मृत्यूसंबंधीचे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. मुंबई पोलीस अत्यंत व्यावसायिक पद्धतीने या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहे. 'सुशांत सिंग राजपूत फाउंडेशन' दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या स्मृती जपण्यासाठी त्याचे सोशल मीडीया अकाउंट सुरू ठेवण्याचे तसेच त्याचे पाटण्यातील घर स्मारकामध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबियांनी घेतला आहे. याशिवाय सिनेमा, विज्ञान आणि क्रीडा क्षेत्रातील तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी 'सुशांत सिंग राजपूत फाउंडेशन' (एसएसआरएफ) स्थापन करण्याचेही राजपूत परिवारने जाहीर केले आहे. शनिवारी सुशांतच्या कुटुंबियांनी अत्यंत भावनात्मक असे जाहीर निवेदन केले आहे. 'तो आमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा आणि प्रेरणा होता. त्याच्या अकस्मात आणि अकाली निधनाने आमच्या आयुष्यात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. या दु:खात आमची साथ देणाऱ्या सुशांतच्या प्रत्येक चाहत्यांचे आम्ही ऋणी आहोत, अशा शब्दांत त्यांनी सुशांतच्या चाहत्यांचेही आभार मानले आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2VrI9FL