Full Width(True/False)

सेटवर नो एन्ट्री ; तरी ज्येष्ठ कलाकार टीव्हीवर

कल्पेशराज कुबल टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणाला आता सुरुवात झाली आहे. चित्रीकरणासाठी घालून दिलेल्या काही नियमांतून सूट देण्यात आली, तरी ज्येष्ठ कलाकारांना मात्र सेटवर येण्यास परवानगी नाकारण्यात आली. काही मालिकांतल्या ज्येष्ठांच्या अनेक व्यक्तिरेखा म्हणजे मालिकेचा कणा असल्यानं मालिकांच्या निर्मात्यांनी त्यासाठी काही शक्कल लढवायचं ठरवलं आहे. ज्येष्ठ कलाकारांची दृश्यं त्यांच्या घरीच चित्रीत करून ती मालिकेत जोडण्याची योजना आखली जातेय. नव्या नियमांसह चित्रीकरणाला सुरुवात झाल्यानंतर कलाकार, तंत्रज्ञ आणि कर्मचारी चेहऱ्यावर मास्क लावून सेटवर वावरत आहेत. मेकअप आर्टिस्ट तर पीपीई किट घालून कलाकारांचे मेकअप करत आहेत. राज्य सरकारनं आखून दिलेल्या मार्गदर्शक बाबींनुसार चित्रीकरणाचं काम सुरू आहे. परंतु, मालिकेतल्या ज्येष्ठ कलाकारांना, अर्थात ६५ हून अधिक वय असलेल्या कलाकारांना इतर कलाकारांसह चित्रीकरणात सहभागी होता येत नाहीय. त्यांना सेटवर न येण्याच्या सूचना सरकारनं दिल्या आहेत. तरीही ज्येष्ठ कलाकारांना मालिकेत दाखवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्येष्ठ कलाकारांची मालिकेतली दृश्यं त्यांच्या स्वतःच्या घरीच चित्रित करण्यात येणार आहेत. '' मालिकेत ज्येष्ठ अभिनेते यांची, तर 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेत ज्येष्ठ कलाकार यांची विशेष भूमिका आहे. या दोन्ही कलाकारांची मालिकेतली दृश्यं त्यांच्याच घरी चित्रीत करण्याची योजना मालिकेच्या निर्मात्यांनी आखली आहे. एक कॅमेरा सेटअप त्यांच्या घरीच बसवण्यात येणार असून, निवडक सीन्सचं चित्रीकरण केलं जाणार आहे. या मालिकांप्रमाणेच रोहिणी हट्टंगडी (डॉक्टर डॉन), प्रदीप वेलणकर (ह.म.बने तु.म.बने), उज्वला जोग (ह.म.बने तु.म.बने), सुनील गोडबोले (ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण) आदी अनेक ज्येष्ठ कलाकार मालिकांमध्ये विशेष भूमिका करत आहेत. पण, आता या कलाकारांचं चित्रीकरणदेखील त्यांच्या घरूनच होणार का याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. परंतु, क्रोमा शूटिंग, ट्रॅक बदलणं आदी पर्याय मालिकेचे निर्माते स्वीकारतील अशी शक्यता आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांचे लाडके ज्येष्ठ कलाकार टीव्ही स्क्रीनवर पाहता येणार आहेत. क्रोमा शूट, वन कॅमेरा सेटअप? क्रोमाच्या हिरव्या पडद्यासमोर संबंधित कलाकाराचं चित्रीकरण करता येते. जेणेकरून मालिकेच्या संकलनावेळी संबंधित कलाकारांचे चित्रित केले भाग मुख्य मालिकेच्या दृश्यांशी जोडले जातात. घरच्या घरी एक कॅमेरा आणि ऑडिओ रेकॉर्डिंगाचा छोटा सेटअप बसवला जातो. तो हाताळणं सहज शक्य होऊ शकेल. विशिष्ट चौकटीतले निवडक सीन याद्वारे चित्रित केले जाऊ शकतात. आमच्या मालिकेतलं ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदारांचं 'अप्पा' हे पात्र कथानक पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वाचं असं पात्र आहे. आम्हाला त्यांचा मालिकेतला ट्रॅक कमी करायचा नाहीय. परंतु, चित्रीकरणाच्या नियमांचं पालन करणंही आवश्यक आहे. पोतदारदेखील पुन्हा चित्रीकरणासाठी उत्सुक आहेत. म्हणून आम्ही त्यांच्या घरीच त्यांचं चित्रीकरण करायचं ठरवलं आहे. वन कॅमेरा सेटअप आम्ही त्यांच्या घरी लावणार आहोत. त्यांच्या घरातले सदस्यही यात आम्हाला सहकार्य करत आहेत. - सुबोध खानोलकर, क्रिएटिव्ह हेड (माझा होशील ना)


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fZLbsL