Full Width(True/False)

हा तर सुशांतचा प्लान मर्डर ...कंगनाचा खळबळजनक आरोप

मुंबई: गेल्या काही महिन्यांमध्ये बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. काल म्हणजेत रविवारी १४ जून रोजी अभिनेता यांनं केल्याची धक्कादायक बातमी आली आणि सर्वांच्याच काळजात धस्स झालं.अनेक सेलिब्रिटींनी सुशांतच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यानं इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचं उत्तररही अद्याप मिळालं नाहीए. तर अनेकांनी सिनेसृष्टीची एक काळी आणि नकारत्मक बाजू समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. सिनेसृष्टीतील काही जणांनीच सुशांतवर आत्महत्या करण्याची वेळ आणली आहे. असं अनेकांनी म्हटलं आहे. अभिनेत्री हिनं देखील बॉलिवूडच्या घराणेशाहीवर हल्ला चढवत सुशांतची आत्महत्या नसून प्लॅन मर्डर असल्याचं म्हटलं आहे. कंगनाच्या टीमकडून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. व्हिडिओत कंगनाना प्रचंड चिडलेली दिसून येतेय. काय म्हणाली कंगना? सुशांतच्या आत्महत्येनं आपल्या सर्वांनाच धक्का बसलाय. पण अनेक जण या घटनेला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करत . षडयंत्र रचत आहेत. कशा प्रकारे मानसिक खच्चीकरणं होतं. त्यानंतर आत्महत्येचं पाऊल उचललं जातं. वैगेरे..वैगेरे... पण ज्या मुलानं इंजिनिअरिंगमध्ये चांगले गुण मिळवले आहेत त्याचं बैद्धिक क्षमतेवर प्रश्न उपस्थिती कसे केले जाऊ शकतात? सुशांतच्या शेवटच्या काही सोशल मीडिया पोस्ट पाहूनही लक्षात येतं की तो चाहत्यांना त्याचे चित्रपट पाहावे यासाठी याचना करत होता. तो स्पष्टपणे सांगतो आहे की इंडस्ट्रीत माझा कोणी गॉडफादर नाही, मला इथून फेकून दिलं जाईल या असं तो सांगतो आहे. मला या इंडस्ट्रीत मला बाहेरच्या व्यक्तीप्रमाणं वाटतं, असंही त्यानं मुलाखतींमध्येही म्हटलं होतं. मग या सर्व गोष्टी तथ्यहीन आहेत का? असा प्रश्न कंगनानं व्हिडिओमध्ये उपस्थित केलाय. इतकंच नाही तर रणवीर सिंगच्या 'गली बॉय' सारख्या वाहियात चित्रपटाला पुरस्कार मिळतो पण सुशांतच्या पदार्पणाच्या चित्रपटालाही पुरस्कार न मिळाल्यानं तिनं संताप व्यक्त केला. आम्हाला तुमचे चित्रपट नको पण आमच्या कामाची दखल आणि कौतुक जे आमचं आहे ते तरी द्या असं कंगना इंडस्ट्रीतील प्रस्थापितांना उद्देशून म्हणतेय. आम्हाला अनेकदा तुझी वेळ वाइट आहे... पण तू चुकीचं पाऊल उचलू नको, असं सांगण्यात येतं... असे विचार मनात भरलेच का जातात असंही कंगनानं म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3daCfPz