Full Width(True/False)

Sushant Singh Rajput case: सुशांतच्या कुटुंबीयांचा जबाब पुन्हा नोंदवणार?

मुंबई: अभिनेता Sushant Singh Rajput याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास Mumbai Police करत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात २७ जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत. रिपोर्टनुसार, पोलिसांनी सुशांतच्या कुटुंबीयांना पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे. त्यांची चौकशी पुन्हा का केली जाणार आहे याचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. सुशांतसिंह राजपूत याचा अंतिम शवविच्छेदन अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. गळफास घेतल्यानेच सुशांतचा मृत्यू झाल्याचे त्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. वेगवेगळ्या अंगाने या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत २७ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबीयांना पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले आहे. मात्र, त्यांची पुन्हा जबाब नोंदणी कशासंदर्भात केली जाणार आहे, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुशांतच्या फायनान्सबाबत आणि कंपनीत रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाच्या भूमिकेबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कसून तपास सुरू सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचे गूढ निर्माण झाले असून, त्याबाबत वांद्रे पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. सोशल मीडियासह सर्वसामान्यांमध्ये सुशांतसिंहच्या आत्महत्येबाबत वेगवेगळे तर्क, कयास मांडले जात आहेत. त्यामुळे हायप्रोफाइल ठरलेल्या प्रकरणात शनिवारी शवविच्छेदन अहवालही पोलिसांना प्राप्त झाला. त्यात सुशांतसिंहचा मृत्यू हा गळफास घेतल्याने झाल्याचे नमूद केले आहे. या अहवालावर अंधेरीतील कूपर रुग्णालयातील पाच डॉक्टरांनी स्वाक्षरी केली असल्याचे परिमंडळ ९ चे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले होते. संभ्रम निर्माण करू नका! या प्रकरणात पोलिसांनी २७ जणांचे जबाब नोंदवून घेतल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, सुशांतच्या घरातून ताब्यात घेतलेल्या वस्तूंचा फॉरेन्सिक विभागाकडून तपास सुरू आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्येसंदर्भात सोशल मीडियावर कोणतीही संभ्रम निर्माण करणारी माहिती पसरवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सुशांतसिंह याचा बॉलिवुडमधील बड्या प्रॉडक्शन हाऊससोबत करार झाला होता. तो करार नेमका काय आहे, हे तपासण्यासाठी त्याची प्रत पोलिसांनी मागविली होती. ही प्रत आम्हाला मिळाली असून त्याविषयी तपास सुरू असल्याचेही त्रिमुखे यांनी स्पष्ट केले होते. शवविच्छेदन अहवालात काय? शवविच्छेदन अहवालानुसार, त्याच्या शरीरावर कोणत्याही खुणा दिसून आल्या नाहीत. तसेच त्याचा मृतदेह एका बाजूला झुकलेल्या अवस्थेत होता, यावरून स्पष्ट होत आहे की, त्याचा मृत्यू गळफासाने झाला होता. दरम्यान, सुशांतने कुठलं विषारी द्रव्य किंवा पदार्थ खाल्ला नव्हता ना याचाही तपास करण्यात येत आहे. फॉरेन्सिक लॅबकडून त्याचा अहवाल अद्याप यायचा आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ilHGim