Full Width(True/False)

48MP क्वॉड कॅमेऱ्यासह रियलमीचा फोन लाँच, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः रियलमीने भारतात आपला ६ सीरीज अंतर्गत नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सल क्वॉड रियर कॅमेरा, फास्ट चार्जिंग सोबत ची बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. आता भारतात रियलमी ६ सीरीजचे तीन स्मार्टफोन Realme 6i, Realme 6, आणि Realme 6 Pro विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वाचाः Realme 6i ची किंमत रियलमी ६ आय ला दोन व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आले आहे. स्मार्टफोनला ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आले आहे. या फोनची किंमत १२ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. म्हणजेच हा फोन १५ हजार रुपयांच्या कमी बजेट फ्रेंडली स्मार्टफोन आहे. फोनला दोन रंगात लूनर व्हाईट आणि एक्लिप्स ब्लॅक या रंगात उपलब्ध करण्यात आले आहे. स्मार्टफोनचा पहिला सेल ३१ जुलै रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. तसेच फोनला फ्लिपकार्ट आणि वरून खरेदी करता येवू शकेल. वाचाः Realme 6iची वैशिष्ट्ये रियलमी ६ सीरीजच्या जुन्या फोन्सप्रमाणे या फोनमध्येही 90Hz डिस्प्ले आमइ मीडियाटेक हीलियो G90T प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस रेजॉलूशन ( 2400x1080 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे. ज्यात पंच होल सुद्धा देण्यात आला आहे. डिस्प्लेचे प्रोटेक्शन करण्यासाठी यात गोरिला ग्लास देण्यात आला आहे. स्मार्टफोनला ४ जीबी आणि ६ जीबी रॅम अशा दोन पर्यायात लाँच केले आहे. स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर काम करतो. कंपनी चीनची असली तरी या फोनमध्ये कोणताही बंदी घातलेल्या ५९ चायनीज अॅप्सपैकी एकही अॅप या फोनमध्ये ठेवला नाही. वाचाः 48 मेगापिक्सल AI कॅमेरा फोनमध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्सचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा मेन सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट लेन्स दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4300mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 30W फ्लॅश चार्ज सपोर्ट करते. फोनसोबत 20W चे चार्जर दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jAxFya