मुंबई: फिटनेसमुळं तरुणांचा आयकॉन बनलेला प्रसिद्ध मॉडेल, अभिनेता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्यानं शेअर केलेल्या पोस्ट नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. नुकतीच त्यानं एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टमध्ये त्यानं त्याच्या आठवणींना उजाळा दिलाय. मिलिंदनं शेअर केलेल्या या थ्रोबॅक पोस्टमध्ये त्यानं १९८९मध्ये केलेल्या पहिल्या फोटोशूटसंदर्भात गोष्टी शेअर केल्या आहेत. तब्बल ३१ वर्षांपूर्वी मिलिंदनं एका जाहिरातीसाठी फोटोशुट केलं होतं. या फोटोशूटसाठी त्याला तब्बल ५० हजार इतकं मानधन दिलं गेलं होतं. याच संदर्भात मिलिंदनं त्याच्या आठवणी शेअर केल्यात.'१९८९मध्ये मला एका जाहिरातीच्या फोटोशूटसाठी तब्बल ५० हजार रुपये मानधन देण्यात आलं होतं. मला आश्चर्य वाटलं, ही लोकं वेडी आहेत काय? असा विचार मी करत होतो. तेव्हा मी केवळ २३ वर्षांचाच होतो. एका हॉटेलमध्ये काम करत होतो. वेटर किंवा कुक व्हायचा विचार तेव्हा मी केला होता', अशा आशयाची एख पोस्ट मिलिंदनं शेअर केली आहे. वादग्रस्त न्यूड फोटो काही दिवसांपूर्वी मिलिंदनं त्याचा एक वादग्रस्त फोटो पुन्हा शेअर केला होता. १९९५च्या ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध झालेल्या ' 'च्या जाहिरातीनं प्रचंड खळबळ उडवून दिली होती. संपूर्ण विवस्त्रावस्थेत एकमेकांना बिलगलेल्या जोडप्याच्या पायात शूज आहेत व दोघांनाही अजगरानं विळखा घातला आहे, असें छायाचित्र असलेली ती जाहिरात पाहून अनेकांचे माथे भडकले होते. हाच फोटो मिलिंदनं शेअर करत चाहत्यांना एक प्रश्न विचारला होता. हा फोटो जर आता पहिल्यांदा प्रदर्शित झाला असता तर काय प्रतिक्रिया असत्या? असा प्रश्न मिलिंदनं नेटकऱ्यांना विचारला होता. '२५ वर्षांपूर्वीचा हा फोटो आहे. त्यावेळी सोशल मीडिया नव्हतं, इंटरनेटही फार वापरलं जात नव्हतं' असंही त्यानं फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलं होतं. कुणी मला कामच देत नाही 'मला चित्रपटांमध्ये काम करायचं आहे; मात्र बॉलिवूडमध्ये कुणी मला कामच देत नाही,' अशी खंत सुपरमॉडेल, अभिनेता मिलिंद सोमणनं एका मुलाखतीत बोलून दाखवली होती.'मेड इन इंडिया’ गाण्यातून प्रसिद्धी मिळवल्यानंतर मिलिंद सोमणची बरीच चर्चा झाली होती. यानंतर मिलिंदनं अनेक चित्रपटांत काम केलं. मात्र, हे चित्रपट त्याला हवं तसं यश देऊ शकले नाहीत. ‘आयर्न मॅन’ म्हणून ओळखला जाणारा मिलिंद फिटनेसचा प्रचार करताना दिसत असला तरी बॉलिवूडपासून सध्या तो लांबच असल्याचं पाहायला मिळतं. ‘बाजीराव मस्तानी’, ‘शेफ’ अशा एखाद्या दुसऱ्या चित्रपटातून मिलिंद चाहत्यांच्या भेटीला आला. 'मला चित्रपटात अभिनय करायला आवडतं, पण बॉलिवूडमधील दिग्दर्शक मला चित्रपटात घेण्यास उत्सुक नाहीत, असं मिलिंद म्हणाला.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30LXz9T