Full Width(True/False)

सुशांतसिंह राजपूतच्या कुत्र्याला मिळालं नवं घर

मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूतने १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतच्या निधनाच्या दुःखातून अजूनही त्याचे चाहते सावरलेले नाहीत. दरम्यान सुशांतच्या बहिणीने श्वेता सिंहने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याच्या पाळीव कुत्र्याला (Fudge) ला सांभाळताना दिसत आहेत. श्वेताने फोटो शेअर करत लिहिले की, बाबांसोबत फज. फोटोत सुशांतचे वडील कुत्र्याला कुरवाळताना दिसत आहेत. सुशांतचे काळ्या रंगाचा लॅब्रेडॉर जातीचा कुत्रा होता. सुशांतने या कुत्र्याचं नाव फज असं ठेवलं होतं. आता सुशांतच्या पश्चात फजला त्याचे बाबा सांभाळत आहेत. सुशांतच्या जाण्यानंतर त्याच्या कुत्र्याला पटणातील वडिलांच्या घरी इतर कुटुंबियांसोबत नेलं असल्याचं म्हटलं जात आहे. फजच्या नावाने सुशांतचं पोस्ट त्याचा जास्तीत जास्त वेळ फजसोबत घालवायचा. त्याने फजसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. 'जर तू मला लक्षात ठेवलंस तर संपूर्ण जग मला विसरलं तरी काही फरक पडत नाही' अशी भावुक पोस्ट त्याने लिहिली होती. केव्हा प्रदर्शित होणार सुशांतचा शेवटचा सिनेमा दरम्यान, १४ जूनला सुशांतने आत्महत्या केली. त्याच्या आकस्मित मृत्यूने साऱ्यांनाच धक्का दिला होता. अनेक महिन्यांपासून तो नैराश्यावर उपचारही घेत होता. आज म्हणजे २४ जुलैला त्याचा शेवटचा सिनेमा दिल बेचारा मुव्ही डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. सुशांतसोबत संजना संघीचीही यात प्रमुख भूमिका आहे. हा सुशांतचे शेवटचा सिनेमा आहे. याआधी सुशांतने छिछोरे आणि ड्राइव्ह सिनेमात काम केलं होतं. दरम्यान, सुशांतच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाच फर्स्टलुक प्रदर्शित करण्यात आला आहे. सुशांतच्या या बायोपिकचं नाव 'सुसाइड या मर्डर : एक स्टार खो गया' असं नाव असणार आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर सेम टू सेम त्याच्या सारखा चेहरा असलेल्या सचिन तिवारी नावाच्या तरुणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. हाच सचिन तिवारी आता सुशांतच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZV75br