मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेटपटू यांची जोडी प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. विराट आणि अनुष्का सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. विराट आणि अनुष्काच्या फोटोंना चाहत्यांचीही पसंती मिळते. नुकताच विराटने अनुष्कासोबतचा असाच एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केला. परंतु, या फोटोऐवजी अनुष्काच्या भन्नाट कमेन्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. विराटच्या फोटोवर अनुष्काने केलेली ही कमेन्ट नेटकऱ्यांना भलतीच भावली. इतकी की नेटकऱ्यांनी आता अनुष्का इतर बायकांप्रमाणे वागतेय असंही म्हटलं. विराटने अनुष्कासोबतचा एक रोमँटिक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. या फोटोत अनुष्का आणि विराट एकमेकांच्या बाजूला बसून निसर्गाचा आनंद घेत आहे. समोरच एक संथपणे वाहणारी नदी आहे तर नदी पलीकडे हिरवीगार झाडं आहेत. हा नजारा जणू ते दोघेही डोळ्यात साठवून घेत आहेत. हा फोटो शेअर करत विराटने लिहिलं, 'तू जिथे माझ्यासोबत आहेस ती जागा माझ्यासाठी घरासारखी आहे.' विराटच्या या पोस्टवर अनुष्काने एखाद्या भारतीय पत्नीप्रमाणे कमेन्ट करत लिहिलं, 'चांगलं आहे. कारण तसंही तू घरी कमीच असतोस.' अनुष्काची ही कमेन्ट पाहून चाहते पोट धरून हसत आहेत. आता तू इतर भारतीय बायकांप्रमाणे टोमणे मारायला शिकलीयेस, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. विराटची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाली आहे. विराट आणि अनुष्का यांनी २०१७ साली लग्नगाठ बांधली होती. अनुष्काने जानेवारी २०२१ मध्ये वामिकाला जन्म दिला.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lhpGc5