Full Width(True/False)

ऋता दुर्गुळे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; दिसणार 'या' भूमिकेत

मुंबई :'दुर्वा', 'फुलपाखरु'सारख्या लोकप्रिय मालिका, '' हे नाटक केल्यानंतर अभिनेत्री एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतेय. 'टीव्ही हे माझं पहिलं प्रेम' आहे म्हणणारी ऋता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. आगामी '' या संगीत रिअॅलिटी शोमध्ये ऋता अँकरच्या, अर्थात सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 'गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे' असं म्हणत ऑगस्ट महिन्यापासून हा कार्यक्रम प्रेक्षकांसमोर येईल. मालिकांतून घराघरांत पोहोचलेली ऋता पहिल्यांदाच सूत्रसंचालक म्हणून दिसणार आहे. या कार्यक्रमात कोण असणार आहे आणि कार्यक्रमाचं नेमकं स्वरुप काय असेल त्या गोष्टी मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहेत. मी यापूर्वी कधीही सूत्रसंचालन केलेलं नाही. काही ऑफर्स आल्या होत्या. पण, मी त्याला पूर्ण न्याय देऊ शकेन का याबाबत मनात विश्वास नव्हता. 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाच्या निमित्तानं मला तो आत्मविश्वास मिळाला. टीव्ही मालिकेत एखादी भूमिका साकारताना लेखकानं लिहून दिलेली वाक्यं सादर करायची असतात. पण, सूत्रसंचालन करताना लेखकाच्या वाक्यांबरोबरच उत्स्फूर्तपणे स्वतःला सादर करायचं असतं. ही उत्स्फूर्तता मला नाटकानं दिली. त्यामुळेच मी अँकरची भूमिका स्वीकारली आहे. - ऋता दुर्गुळे, अभिनेत्री


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fXioFE