Full Width(True/False)

आता पोलिसांच्या मदतीला धावून आला सोनू सूद

मुंबई- व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने हजारो स्थलांतरी मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवले. या कामासाठी त्याचं भरभरून कौतुकही झालं. सोनू आताही या कठीण काळात अनेक गरजूंची मदत करत आहे. मजुरांनंतर आता सोनू महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीला धावून आला आहे. सोनूने पोलिसांना २५ हजार फेस शील्ड डोनेट केले आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना ट्विटरवर सोनूसोबतचा फोटो शेअर करत त्याचे आभारही मानले. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, 'आमच्या पोलीस कर्मचार्‍यांना २५ हजार फेस शिल्ड देऊन केलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल मी यांचे आभार मानतो.' देशमुख यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघांनीही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले होते. देशमुख यांच्या ट्वीटला उत्तर देताना सोनूने लिहिले की, 'तुमच्याकडून झालेलं कौतुक ऐकून फार सन्मानीत झाल्यासारखं वाटत आहे. माझे सर्व पोलीस बांधव हे खऱ्या अर्थाने हिरो आहेत. त्यांच्या या अतुलनीय कामाच्या मोबदल्यात मी त्यांच्यासाठी एवढं तर नक्कीच करू शकतो. जय हिंद' दरम्यान, करोना व्हायरसमध्ये केलेल्या कामावर सोनू सूद लवकरच एक पुस्तक लिहिणार आहे. पुस्तकाचं नाव काय असेल हे अजून त्याने ठरवलं नाही. या पुस्तकात लोकांची मदत करणं आणि त्या दरम्यान आलेली संकटं हे सर्व अनुभव तो या पुस्तकात मांडणार आहे. पेंग्विन रेंडम हाउस इंडिया या पब्लिकेशनने बुधवारी हे पुस्तक वर्षाअखेरीसपर्यंत येईल असे सांगितले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32t3DWX