Full Width(True/False)

7000mAh बॅटरीचा सॅमसंग फोन सर्वात आधी भारतात लाँच होणार

नवी दिल्लीः सॅमसंगने नुकताच गॅलेक्सी एम आणि गॅलेक्सी ए सीरीज अंतर्गत अनेक स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने आता आणि Galaxy M31s वर काम करीत आहे. गॅलेक्सी एम५१ ला नुकताच Bluetooth SIG कडून सर्टिफिकेट मिळाले आहे. या स्मार्टफोनला सप्टेंबर महिन्यात भारतात लाँच करण्यात येणार आहे. या लिस्टिंग पासून सॅमसंगच्या मिड-रेंज फोन लवकरच लाँच करण्यात येणार आहे. वाचाः गॅलेक्सी एम51 ला Bluetooth SIG च्या डेटाबेस मॉडल नंबर SM-M515F नावाने लिस्ट करण्यात आले आहे. सॅमसंगने मे २०२० च्या चौथ्या आठवड्यात येणाऱ्या मिड रेंज स्मार्टफोनच्या सर्टिफिकेशनसाठी अप्लाय केला होता. आता कंपनीला फायनल मंजुरी मिळाली आहे. फोनमध्ये A2DP, AVRCP, LE,सोबत ब्लूटूथ ५.० आहे. वाचाः याआधी आलेल्या रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, गैलेक्सी एम51 मध्ये चायना स्टार ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजीकडून बनवण्यात आले आहे. ओलेड स्क्रीनचा वापर करण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉयड १० सिस्टम देण्याची शक्यता आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७३० जी प्रोसेसर, ८ जीबी रॅम, १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज आणि मायक्रोएसडी कार्ड स्लॉट दिला जावू शकतो. फोनमध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट रीडर दिला जावू शकतो. वाचाः या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जावू शकतो. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा ISOCELL Bright GW1 कॅमेरा सेन्सर दिला आहे. गॅलेक्सी एम५१ मध्ये काही बदल करून ए५१ रीब्रँडेड व्हर्जन होणार आहे. फोनमद्ये जास्त रिझॉल्यूशन आणि १५ वॅट फास्ट चार्जिंग सोबत दिली जाण्याची शक्यता आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2CdO0bw