Full Width(True/False)

सॅमसंगच्या फोनवर ७ हजारांची सूट, ८ हजारांचा बोनस

नवी दिल्लीः Samsung चा फोल्डेबल Galaxy Z Flip खरेदी करण्याची जबरदस्त संधी आहे. कंपनीने या फोनमध्ये ७ हजार रुपयांची कपात केली आहे. ही कपात झाल्यानंतर या फोनची सुरुवातीची किंमत 1,15,999 रुपयांवरून 1,08,999 झाली आहे. तसेच या स्टायलिश फोल्डेबल फोनवर कंपनी ८ हजार रुपयांचा अपग्रेड बोनस देत आहे. अपग्रेड बोनस काही निवडक स्मार्टफोन्सवर दिला जात आहे. वाचाः आकर्षक ईएमआयवर खरेदी करा फोन युजर्संना फोन खरेदी करणे सोपे जावे यासाठी गॅलेक्सी झेड फ्लिपवर आकर्षक नो कॉस्ट ईएमआय चा पर्याय दिला जात आहे. नो कॉस्ट ईएमआय सर्व मुख्य बँकेच्या कार्ड्सवर ऑफर केला जात आहे. या फोनला जास्तीत जास्त १८ महिन्यांच्या ईएमआयवर खरेदी करता येऊ शकते. वाचाः गॅलेक्सी झेड फ्लिपचे फीचर्स आणि वैशिष्ट्ये सॅमसंगचा हा फोल्डेबल फोन ६.७ इंचाचा HDR 10+ डायनामिक AMOLED फुल एचडी+ डिस्प्ले सोबत येतो. या फोनमध्ये खास फोल्डेबल ग्लास इनफिनिटिक्स फ्लेक्स डिस्प्लेचा वापर केला आहे. फोनच्या बाहेरच्या बाजुने डिस्प्ले १.०५ इंचाचा दिला आहे. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत येत असलेल्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८५५ प्लस ऑक्टा - कोर प्रोसेसर दिला आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा प्लस १२ मेगापिक्सलचा ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. सेल्फी साठी या फोनमध्ये १० मेगापिक्सलचा पंच होल कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 3300mAh ची बॅटरी दिली आहे. फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे, यात ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. यात एक सिम ई-सीम आहे. तर एक नॅनो सिम कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. फोन वेगवेगळ्या अँगलवर उघडता येतो. यात सेल्फी घेण्यासाठी ब्लॉगिंग करणे करणे सोपे बनले आहे. फोनमध्ये नवीन गुगल डूओ इंटग्रेशन देण्यात आले आहे. जो व्हिडिओ चॅटिंग अनुभव अधिक सोपा आणि मस्त करण्यास मदत करतो. वाचाः फोनचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे हा अॅक्सिडेंटल डॅमेज केअर सोबत येतो. यात वन टाईम स्क्रीन प्रोटेक्शन आणि 24x7 डेडिकेटेड कॉल सेंटर सपोर्ट सुद्धा मिळतो. फोनमध्ये मिरर गोल्ड, मिरर पर्पल आणि मिरर ब्लॅक कलर या पर्यायात येतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38kt7a4