Full Width(True/False)

ऐश्वर्या व आराध्याला हलका ताप; नानावटी रुग्णालयात केले दाखल

मुंबई: हलका ताप असल्याने अभिनेत्री तसेच कन्या आराध्या या दोघींना तातडीने नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महानायक व पुत्र यांच्यापाठोपाठ ऐश्वर्या व आराध्या यांचा चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आला होता. अमिताभ व अभिषेक यांना लगेचच नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र ऐश्वर्या व आराध्या यांना होम क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आले होते. दरम्यान, आज दोघींनाही हलका ताप होता त्यामुळे खबरदारी म्हणून तातडीने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या नानावटी रुग्णालयात दोघींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. ( admitted at ) वाचा: अमिताभ बच्चन आणि अभिषेक यांचा करोना चाचणी अहवाल एकाच दिवशी आला होता. दोघेही करोना पॉझिटिव्ह निघाल्याने बच्चन कुटुंबाचे चाहते चिंतेत पडले. खुद्द अमिताभ यांनीच आपल्या करोना चाचणी अहवालाबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती. त्यानंतर अभिषेकनेही ट्विटरवरून आपल्या चाचणीबद्दल अपडेट्स दिले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कुटुंबातील अन्य सदस्यांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यात ऐश्वर्या आणि आराध्या या दोघींचा अहवाल पॉझिटिव्ह तर जया बच्चन यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. याबाबत अभिषेकनेच ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली होती. मात्र या दोघींना घरातच क्वारंटाइन करण्यात आले होते. याबाबत पालिकेलाही माहिती देण्यात आली होती. दरम्यान, आज दोघींना हलका ताप होता. त्यात श्वास घेण्यास थोडासा त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांनी तपासणी केली. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तातडीने दोघींना रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. वाचा: अमिताभ यांनी चाहत्यांचे मानले आभार बच्चन यांच्या कुटुंबातील चार सदस्य करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मुंबई पालिकेने अमिताभ यांचा जलसा बंगला कंटेन्मेंट झोन घोषित केला आहे. रविवारी या बंगल्यात पालिका कर्मचाऱ्यांकडून सॅनिटायझेशन करण्यात आले. त्याचवेळी अमिताभ यांचे एकूण चार बंगले सील करण्यात आले आहेत. करोनाबाबत असलेल्या नियमावलीनुसार सर्व आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत. याबाबत बच्चन कुटुंबाकडूनही पूर्ण सहकार्य केलं जात आहे. खुद्द अमिताभ बच्चन हे सर्वाधिक सतर्क आहेत. स्वत:चा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी लगेचच सोशल मीडियावरून माहिती दिलीच शिवाय त्यांच्या संपर्कातील सर्वांनाच सावध केले. गेल्या दहा दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने आपली करोना चाचणी करून घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर अमिताभ रुग्णालयात असूनही सोशल मीडियावर सक्रिय आहेत. देशभरातून त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना, होमहवन केले जात आहेत. या सर्वांचेच अमिताभ यांनी आभार मानले आहेत. वाचा:


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fFErQO