Full Width(True/False)

१० हजारांपेक्षा कमी किंमतीत भारतात लाँच झाले हे लेटेस्ट स्मार्टफोन

भारतात गेल्या दोन तीन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. देशातील लॉकडाऊन आता हळू हळू कमी झाला आहे. केंद्र वा राज्य सरकारांनी आपापल्या क्षेत्रात काही अटी व शर्थींवर लॉकडाऊन कमी केले आहे. ज्या ठिकाणी करोना रुग्णांची संख्या कमी आहे. त्या ठिकाणी बऱ्यापैकी व्यवहारांना सूट दिली आहे. देशात लॉकडाऊन सुरू होता. त्यामुळे सर्व व्यवहारांवर बंदी होती. परंतु, आता जवळपास सर्वच क्षेत्रांना काही नियम व अटीवर सूट दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊन उघडल्यानंतर अनेक कंपन्यांनी देशात आपले स्मार्टफोनची लाँचिंग करायला सुरुवात केली आहे. लॉकडाऊन नंतर अनेक कंपन्यांनी आपल्या फोनची लाँचिंग ऑनलाइन केली असून त्याची विक्री सुरु केली आहे. यामध्ये सॅमसंग, ओप्पो, लावा, रियरमी या कंपनीने फोन लाँच केले आहेत. जाणून घ्या १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच झालेले लेटेस्ट स्मार्टफोनची यादी....

ओप्पो ए११के ला भारतात गुपचूप लाँच करण्यात आले आहे. २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ८ हजार ९९० रुपये आहे. फोनला डीप ब्लू आणि फ्लोइंग सिल्वर कलरमध्ये आणले आहे. हँडसेमध्ये ३डी फ्लोईंग ब्लेज डिझाईन आणि ग्रेडिएंट बॅक फिनिश देण्यात आली आहे. फोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअप आणि वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ६.२ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोन अँड्रॉयड ९ पाय बेस्ड कलरओएस ६.१ वर चालतो. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा तसेच २ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा दिला आहे. ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4230mAh बॅटरी दिली आहे.

रिलयमी सी ११ च्या २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेजच्या फोनची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे. फोन रिच ग्रीन व रिच ग्रे कलरमध्ये लाँच केले आहे. हँडसेटला अँड्रॉयड १० बेस्ड रियलमी यूआयवर चालतो. फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस मिनी ड्रॉप डिस्प्ले आहे. रियलमी सी ११ मध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो जी ३५ प्रोसेसर दिला आहे. स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट लेन्सचा ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी दिली आहे.

टेक्नो स्पार्क प्रो मध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. या फोनची किंमत १० हजार ४९९ रुपये आहे. फोनमध्ये १० बेस्ड HiOS वर चालतो. या फोनमध्ये ६.६ इंचाचा फुल एचडी प्लस होल पंच डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो ए २५ प्रोसेसर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, २ मेगापिक्सलचा अल्ट्रा - वाइड आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

लावा कंपनीचा हा एन्ट्री लेवल स्मार्टफोनची किंमत ५ हजार ७७४ रुपये आहे. फोनला मिडनाईट ब्लू आणि अंबर रेड कलरमध्ये लाँच करण्यात आले आहे. फोनमध्ये ५.४५ इंचाचा एचडीप्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये गीगाहर्ट्ज ऑक्टा कोर प्रोसेसर, २ जीबी रॅम व १६ जीबी चा स्टोरेज दिला आहे. लावा झेड ६१ प्रोमध्ये ८ मेगापिक्सलचा रियर आणि ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. हा फोन फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती लावा कंपनीने दिली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम ०१ एस मध्ये ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज दिला आहे. या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. फोन ब्लू आणि ग्रे कलरमध्ये येतो. हँडसेट मध्ये ६.२ इंचाचा एचडी प्लस टीएटी डिस्प्ले, इनफिनिटी व्ही कट नॉच, ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो पी २२ प्रोसेसर देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये फोटोग्राफीसाठी यात १३ मेगापिक्सलचा तसेच २ मेगापिक्सलचा ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4000mAh ची बॅटरी दिली आहे.



from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fEVVgq