Full Width(True/False)

'आत्मनिर्भर' ज्योती कुमारीच्या आयुष्यावर येतोय सिनेमा;स्वत:च साकारणार भूमिका

मुंबई: आजारी वडिलांना सायकलवर बसवून असा सुमारे १२०० किमीचा प्रवास करणाऱ्या ज्योती कुमारीचा हा प्रवास आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ज्योती कुमारीच्या आयुष्यावर चित्रपट येणार आहे. 'वी मेक्स फिल्म्स' या बॅनरनं ज्योति कुमारीचा प्रवास पडद्यावर मांडण्याचा निर्णय घेतला आहे. तर ज्योती स्वत: या चित्रपटात भूमिका करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. ज्योती कुमारीच्या या चित्रपटाचं नाव आत्मनिर्भर असं असून शाइन शर्मा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपट हिंदी, इंग्रजी आणि मैथिली अशा तिन भाषांनध्ये डब करण्यात येणार आहे. चित्रपटात दिल्ली ते दरगंभा पर्यंतचा प्रवास दाखण्यात येणार असून शूटिंग सेटवर न करता रिअल लोकेशन्सवर करण्यात येणार असल्याचंही निर्मात्यांनी सांगितलं. तसंच ही डॉक्युमेंट्री नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केलं. सात दिवसांत गाठले घर ज्योतीचे वडील मोहन पासवान हे गुरुग्राम येथे ऑटोरिक्षा चालवतात. पण त्यांना दुखापत झाली आणि त्यांच्या उत्पन्नाचा मार्ग बंद झाला. त्यांना आपली ऑटोरिक्षा मालकाला परत करावी लागली. त्यामुळं त्यांनी आपल्या मूळ गावी दरभंगा इथं जाण्याचा निर्णय घेतला. पण लॉकडाउनमध्ये गाडी किंवा ट्रेननं बिहारला जाणं शक्य होत नव्हतं. म्हणून शेवटी तिनं आपल्या वडिलांना सायकलवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. वडिलांना सायकलच्या मागे असलेल्या 'कॅरिअर'वर बसवून गुरुग्राम ते दरभंगा हे १२०० किमीचे अंतर तिनं अंतर ७ दिवसांत कापलं. इवांका ट्रम्प यांनीही केलं कौतुक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्पन यांनी ही ज्योतीची पाठ थोपटली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी तिच्या साहसाचं कौतुक केलं होतं. सायकल फेड्रेशनकडून चाचणीसाठी बोलवण्यात आलं ज्योतीची हिंमत पाहून सायकलिंग फेडरेशनने तिला पुढील महिन्यात चाचणीसाठी बोलावलं होतं. सायकलिंग फेडरेशनचे कार्याध्यक्ष ओंकार सिंग म्हणाले होते की, जर चाचणीत यशस्वीरित्या उत्तीर्ण झाली तर दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या राष्ट्रीय सायकलिंग अकादमीत तिची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड केली जाईल. लॉकडाउन आणि करोनावर चित्रपटलिवूडच्या सिनेनिर्मात्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शीर्षकांमध्ये 'करोना', 'लॉकडाउन' हे शब्द वापरून संबंधित सिनेमांच्या नावांची नोंदणी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे 'करोना' आणि 'लॉकडाउन' हे शब्द सध्या सिनेनिर्मात्यांच्या अधिक पसंतीस उतरत आहे. कारण, सिनेमांच्या नावांसाठी याच शब्दांना अधिक प्राधान्य असल्याचं निदर्शनास आलंय. सिनेमाची कथा ठरण्याअगोदरच सिनेमाचं शीर्षक आपल्या मालकीचं करून घेण्यासाठी निर्मात्यांमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळतेय. त्यामुळेच सध्या प्रोडक्शन असोसिएशनकडे सिनेमासाठीच नाव निर्माते अगोदरच रजिस्टर करून ठेवत आहेत. त्याचप्रमाणे आयएमपीपीए अर्थात 'इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर असोसिएशन'कडे देखील सिनेनिर्माते करोनावर आधारित चित्रपटाची नावं नोंदवत आहेत. लवकरच चित्रपटांचं चित्रीकरण सुरू होईल. त्यामुळे येत्या वर्षात बॉलिवूडमध्ये लॉकडाउन आणि करोना या विषयांवरील सिनेमांची रांग लागण्याची शक्यता आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38kW45B