मुंबई- प्रतिभावान लोकांची आपल्या देशात कमतरता नाही. पण सोयी- सुविधा उपलब्ध नसल्यामुळे साऱ्यांनाच ओळख मिळते असं नाही. पण जर बॉलिवूडमधील सेलिब्रिटींपैकी एकाची नजर जर तुमच्या कलेवर गेली आणि तुमच्यासोबत एक व्हिडिओही केला तर... असंच काहीसं रस्त्यावर बासूरी वाजवणाऱ्या यांच्यासोबतही झालं. मिका सिंगची त्याच्यावर नजर गेली आणि मिकाने त्याच्यासोबत चक्क एक व्हिडिओही केला. बॉलिवूडमधील प्रसिद्द गायक मिकाने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली. त्याच्या या व्हिडिओमध्ये नौशादही दिसत आहेत. त्याचं झालं असं की, मिकाच्या बिल्डिंगच्या बाहेर नौशाद बासूरी वाजवत होते. मिकाने त्यांची बासूरी ऐकली आणि त्यांना घरी बोलावलं आणि सोशल मीडियावर त्यांची एक झलक दाखवली. मिका आणि नौशाद अली यांनी मिळून १९७१ मधील आप आए बहार आई सिनेमातील मुझे तेरी मोहब्बत का सहारा मिल गया होता या गाण्यावर एक व्हिडिओ तयार केला. व्हिडिओत मिका कॅसिओ वाजवताना दिसत आहे तर नौशाद बासूरी वाजवत आहेत. यानंतर नौशाद यांनी या गाण्याव्यतिरिक्त कोरा कागज था ये मन मेरा हे गाणंही बासुरीवर वाजवलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना मिका सिंगने लिहिले की, 'मला रस्त्यावर ही व्यक्ती भेटली. मला वाटलं एकत्र चहा प्यायला हवा आणि त्यांची बासूरी ऐकली पाहिजे. आता तुम्हीही यांना भेटा. तुम्ही एखाद्या गरजूला आर्थिक मदत करू शकत नसला तरी त्यांच्या कलेला नक्कीच पाठिंबा देऊ शकता. तुमचा थोडासा वेळ एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2D5TyF6