Full Width(True/False)

'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेत बाल शिवाजी महाराज येणार भेटीला

मुंबई: '' या मालिकेचं चित्रीकरण सध्या गोरेगाव येथील चित्रनगरीत सुरु आहे. तीन महिन्यांच्या कालावधीनंतर सर्व कलाकार आता सेटवर परतले आहेत. येत्या आठवड्यात मालिकांचे नवे भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पण, सोबतच आणखी एक आकर्षण मालिकेत प्रेक्षकांसाठी असणार आहे. १९ फेब्रुवारीला शिवजयंती दिवशी मालिकेतसुद्धा शिवजन्म झाला आणि स्वराज्य बांधणीच्या प्रवासाला सुरुवात झाली. मालिका आता काही वर्षांचा लीप घेत असून बाल शिवाजी महाराज आता भेटीला येणार आहेत. मालिकेत बालकलाकार आर्यन लहामगे छोट्या शिवबांच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी आर्यनने 'एक होती राजकन्या' आणि 'सावित्रीजोती' मालिकेतही काम केलं होतं. यावेळी छोट्या शिवबाची भूमिका साकारण्यासाठी आर्यनने तलवारबाजी आणि घोडेस्वारीचं प्रशिक्षण घेतलं आहे. आनंद वेगळाच पहिल्याच मालिकेत छत्रपती शिवरायांच्या मातोश्री असलेल्या जिजामातांसारखी भूमिका साकारायला मिळणं हे माझं भाग्य आहे. लॉकडाउन जेव्हा वाढत होतं तेव्हा मालिका पुन्हा सुरू होणार की नाही अशी भीती मनात होती. पण, आता पुन्हा चित्रीकरण सुरू झालंय. पुन्हा काम करायला मिळतंय याचा आनंद वेगळाच आहे. आमची टीम आता अर्धी झाली आहे. ऐतिहासिक मालिका असल्यानं चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीची तयारी जास्त असते. पण, आमची टीम ते काम कौशल्यानं सांभाळत आहे. प्रत्येकाच्या मनात करोनाची धास्ती असल्यानं सेटवर अधिक सजगतेनं सगळ्यांचा वावर आहे. सरकारचे नियम पाळत, एकमेक‍ांची काळजी घेत चित्रीकरणाचा प्रारंभ झाला आहे. - अमृता पवार, (स्वराज्यजननी जिजामाता) दरम्यान, फिल्मसिटीमध्ये सध्या 'स्वराज्यजननी जिजामाता', 'स्वामिनी', 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' यासारख्या मराठी मालिकांचे सेट आहेत. यातील 'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. तर इतर दोन मालिकांचं चित्रीकरण येत्या काही दिवसांतच सुरू होणार आहे. 'गुड्डन तुम से ना हो पाएगा', 'कुमकुम भाग्य', 'कुंडली भाग्य', 'तुझसे है राबता' आदी मालिकांचंही चित्रीकरण सुरू झालं आहे. सर्व मालिका निर्मात्यांनी त्यांच्या सेटवर सुरक्षितेतच्या उपाययोजना आखल्या आहेत. प्रत्येकालाच सुरक्षित वातावरणात काम करायचं आहे. त्यामुळे फिल्मसिटी प्रशासनाकडूनदेखील संपूर्ण सहकार्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्य सरकारच्या सर्व नियमांचं पालन केलं जात आहे की नाही याकडे आम्ही बारकाईनं लक्ष ठेवून आहोत. खरं सांगायचं झालं तर सर्व सेटवर योग्य काळजी घेत काम सुरू झालंय. - सुभाष बोरकर, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, फिल्मसिटी.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Z2pwdT