Full Width(True/False)

मोटोरोलाच्या या फोनचा आज सेल, पाहा ऑफर्स

नवी दिल्लीः कंपनीचा Motorola One Fusion+ स्मार्टफोनचा आज पुन्हा एकदा सेल आयोजित करण्यात आला आहे. मोटोरोलच्या या फोनला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या सेलमध्ये हा फोन आउट ऑफ स्टॉक झाला होता. हँडसेट्सला ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आज दुपारी १२ वाजेपासून खरेदी करता येणार आहे. वाचाः Motorola One Fusion+ स्मार्टफोन झाला ५०० रुपये महाग मोटोरोला वन फ्युजन प्लस ला भारताता १६ हजार ९९९ रुपयांत लाँच केले होते. परंतु, आता या फोनच्या किंमतीत ५०० रुपये वाढ करण्यात आली आहे. जर तुम्हाला फोन खरेदी करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला १७ हजार ४९९ रुपये मोजावे लागतील. हँडसेट मूनलाइट व्हाइट आणि ट्विलाइट ब्लू कलर मध्ये लाँच करण्यात आले होते. मोटोच्या या फोनमध्ये अनेक प्रीमियम फीचर्स दिले आहेत. हँडसेटमध्ये पॉपअप कॅमेऱ्यासोबत इनफिनिटी डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोनची टक्कर रेडमी नोट प्रो मॅक्स, रियलमी ६ प्रो, आणि पोको एक्स २ सोबत होईल. वाचाः मोटोरोलाचा हा फोन फ्लिपकार्टवरून अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास यावर ५ टक्के सूट मिळणार आहे. तसेच अॅक्सिस बँक बज क्रेडिट कार्डवर सुद्धा ५ टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे. नो कॉस्ट ईएमआय ऑफर सुद्धा दिली जात आहे. पार्टनर ऑफर अंतर्गत यूट्यूब प्रीमियमचा ६ महिने फ्री टायल मिळणार आहे. वाचाः Motorola One Fusion+ ची वैशिष्ट्ये स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा टोटल व्हिजन डिस्प्ले, फुल एचडी मिळणार आहे. या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. फोनची स्टोरेज कार्ड़च्या मदतीने १ टीबी पर्यंत वाढवता येवू शकतो. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३० जी प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा दिला आहे. तसेच ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, ५ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. एलईडी फ्लॅश सोबत ४ के व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट मिळतो. लेटेस्ट मोटोरोलाच्या या फोनसोबत प्लास्टिक फ्रेमसोतब प्लास्टिक रियर पॅनेल दिला आहे. फोनला चार्जिंग साठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fpPJbN