Full Width(True/False)

रेडमी नोट ९ प्रो मॅक्सचा आज फ्लॅश सेल, ऑफर मिळणार

नवी दिल्लीः शाओमीचा रेडमी मोट ९ प्रो मॅक्सचा आज दुपारी १२ वाजता फ्लॅश आयोजित करण्यात आला आहे. हा फोन दुपारी १२ वाजता अॅमेझॉनवरून खरेदी करता येवू शकेल. या फोनला भारतात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता पर्यंत झालेल्या फ्लॅश सेलमध्ये काही मिनिटाच्या आत हा फोन आउट ऑफ स्टॉक झाला आहे. शाओमीच्या रेडमी नोट सीरिजला भारतात खूप चांगली डिमांड आहे. रेडमीच्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर, क्वॉड रियर कॅमेरा आणि साईड माउंटेड फिंगरप्रिंट यासारखे ऑप्शन देण्यात आले आहेत. वाचाः सेलमध्ये ऑफर मिळणार रेडमी नोट ९ प्रो मॅक्सची सुरुवातीची किंमत १६ हजार ४९९ रुपये आहे. ही किंमत ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजची आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १७ हजार ९९९ रुपये आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. अॅमेझॉनवरून हा फोन खरेदी करताना ग्राहक नो कॉस्ट ईएमआय आणि स्टँडर्ड ईएमआय हे दोन ऑप्शन निवडू शकतात. तर प्राईम मेंबर्स जर अॅमेझॉनवरून आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डचा वापर करीत असल्यास ५ टक्के डिस्काउंट मिळवू शकतो. तसेच अॅमेझॉन आणि mi.com या दोन्हींवर २९८ रुपये आणि ३९८ रुपयांच्या अनलिमिटेड पॅक्ससोबत डबल डेटा बेनिफिट्स ऑफर केले जात आहे. वाचाः जबरदस्त फीचर्स या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले दिला आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅग ७२० जी प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनध्ये ८ जीबी पर्यंत रॅम देण्यात आले आहे. फोनमध्ये १२८ जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येवू शकतो. मध्ये 5,020 mAh ची बॅटरी दिली आहे. जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. वाचाः 64MP चा प्रायमरी कॅमेरा मिळणार रेडमीच्या या स्मार्टफोनमध्ये रियररमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये रियरमध्ये मेन कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा आहे. फोनच्या रियरमध्ये अल्ट्रा वाइड अँगल लेन्स दिला आहे. तसेच ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनच्या बॅकला ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fHTTMF