Full Width(True/False)

या iPhone यूजर्संना मिळणार १८८५ रुपये, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः वादग्रस्त ठरलेले बॅटरीगेट प्रकरण मिटवण्यासाठी तयार आहे. कंपनी आता त्या युजर्संना २५ डॉलर म्हणजेच १८८५ रुपये देणार आहे. ज्या युजर्संचे आयफोन कोणत्याही नोटिसीविना जाणीवपूर्वक स्लो करण्यात आले होते. त्या सर्व युजर्संना कंपनी २५ डॉलर देणार आहे. जे लोक यासाठी दावा करतील त्या सर्व युजर्संना कंपनी १८८५ रुपये देणार आहे. हे सर्व प्रकरण मिटवण्यासाठी कंपनीला ३१० मिलियन डॉलर ते ५०० मिलियन डॉलरपर्यंत खर्च करावे लागण्याची शक्यता आहे. वाचाः या आयफोनला मिळणार कव्हर सेटलमेंटच्या माहितीनुसार, पेआउट मध्ये अॅपल , 6 Plus, 6s, 6s Plus, 7, 7 Plus आणि फोनला कव्हर देणार आहे. हे सर्व फोन जे iOS 10.2.1 किंवा त्यानंतर आलेल्या ओएस किंवा त्यानंतर 11.2 वर काम करते. वाचाः ६ ऑक्टोबर आधी करावा लागणार दावा क्लेमचा फायदा त्याच युजर्संना मिळेल. ज्यांनी वर दिलेल्या आयफोन्सला २१ डिसेंबर २०१७ च्या आधी फोन खरेदी केलेला असेल. क्लेम सबमिट करण्यासाठी एक डेडिकेटेड वेबसाइटचा वापर केला जावू शकतो. ही प्रक्रिया ऑनलाइन सोबत मेलने सुद्धा करण्यात येवू शकते. या क्लेमसाठी ६ ऑक्टोबर डेडलाईन ठरवण्यात आली आहे. वाचाः अॅपलने मानली चूक अॅपलने २०१७ मध्ये चूक मानली आहे. त्यांचे सॉफ्टवेअर अपडेटमुळे काही आयफोन्सला स्लो करण्यात आले होते. त्यामुळे बॅटरी स्लो झाली होती. अॅपलने या संबंधी स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, आयफोन्सला अचानक शटडाऊन होण्यापासून रोखता यावे यासाठी हे करण्यात आले होते. कंपनीने सांगितले यामुळे फोनची बॅटरी वाचवता येवू शकते. या सेटलमेंट शिवाय अॅपलवर फ्रेंच रेग्युलेटर्सने २७ मिलियन डॉलर आणि इटलीची एक तपास एजन्सीने ५ मिलियन डॉलरचा दंड लावला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eyNQbE