मुंबई टाइम्स टीम आपल्या देशाच्या आजवरच्या इतिहासात अनेक वीरांची आणि त्यांच्या शौर्यगाथेची नोंद झाली आहे. या वीरांची शौर्यगाथा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं अनेक ऐतिहासिक सिनेमांची निर्मिती करण्यात मराठी सिनेसृष्टीत आणि बॉलिवूडमध्ये करण्यात आली. त्यामुळे सिनेविश्वात ऐतिहासिक सिनेमांची संख्याही मोठी असल्याचं दिसून येतं. यामध्येच आता आणखी एका शूरवीराची शौर्यगाथा उलगडण्यात येणार आहे. आरमाराचे जनक यांचा जीवनप्रवास लवकरच यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.कान्होजी आंग्रे यांची शौर्यगाथा लवकरच 'कान्होजी आंग्रे' या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. कान्होजी आंग्रे यांची धास्ती संपूर्ण युरोपच्या नौसेनेला होती. विशेष म्हणजे कान्होजी आंग्रे यांचा पराभव करण्यासाठी इंग्रज, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज हे सगळे एकत्र आले होते. मात्र तरीदेखील ते दर्या सारंग कान्होजी आंग्रे यांचा पराभव करु शकले नाही. त्यामुळेच त्यांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशानं 'कान्होजी आंग्रे' या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. दरम्यान, डॉ. सुधीर निकम लिखित हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप केवळ सिनेमाची घोषणा झाली असून, यात कोणते कलाकार चमकणार हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. कलाकारांची नावं गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Oe6bQt