मुंबई- अभिनेता लॉकडाउनमुळे घरीच आहे आणि आपल्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहे. यासोबतच तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशीही संपर्कात असतो. मीडिया रिपोर्टनुसार, असं सांगण्यात येत आहे की कार्तिकने यापुढे चायनीज मोबाइल फोनचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच तो चायनीज ब्रॅण्डसोबत करण्यात आलेला करार मोडणार आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केला हा फोटो- सध्या कार्तिक आर्यन चायनीज मोबाइल फोन ओप्पोचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहे. या फोनसाठीच्या अनेक जाहिरातींमध्ये कार्तिकला पाहण्यात आलं आहे. पण आता त्याने यापुढे हा करार सुरू न ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. भारत- चीन दरम्यानच्या वाढत्या सीमाप्रश्नानंतर कार्तिकने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. पण स्वतः कार्तिकने याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. नुकताच त्याने ओप्पो एवजी आयफोनसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. कार्तिक आर्यनचे सिनेमे- कार्तिकच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर लवकरच तो कॉलिन डी कुन्हा दिग्दर्शित 'दोस्ताना २' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत जान्हवी कपूर दिसणार आहे. याशिवाय दिग्दर्शक ओम राऊतसोबतही काम करताना दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत कियारा आडवाणी काम करणार आहे. कार्तिक आर्यनचा शेवटचा सिनेमा 'लव आज कल' होता. इम्तियाज अली दिग्दर्शित या सिनेमात त्याच्यासोबत सारा अली खानने काम केलं होतं. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान, अभिनेता कार्तिक आर्यननं साधारणपणे सहा महिन्यांपूर्वी स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू केलं होतं. परंतु तेव्हा त्याला फारसा वेळ मिळाला नाही. लॉकडाउनमुळे मिळालेल्या वेळेचा उपयोग करून घेत कार्तिक त्याच्या युट्यूब चॅनलवर जोमानं अॅक्टीव्ह झाला आहे. काही दिवसांपूर्वी 'करोना स्टॉप करोना' या हॅशटॅगखाली त्यानं पोस्ट केलेल्या मोनोलॉग आणि रॅपसाँगला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर कार्तिक 'कोकी पूछेगा' ही व्हिडीओ सीरिज त्याच्या यूट्यूब चॅनलवर घेऊन आलाय. या सीरिज अंतर्गत कार्तिक अनेकांची मुलाखत घेतो आहे. आतापर्यंत कार्तिकनं करोनाशी लढा देणारे डॉक्टर्स, पोलीस अशा अनेकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. कार्तिकच्या या उपक्रमाला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3eguBDE