तुम्हाला जर नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. टॉपच्या स्मार्टफोन कंपन्यांनी आपल्या अनेक प्रसिद्ध हँडसेट्सवर डिस्काउंट दिले आहेत. त्यामुळे या कंपन्यांचे फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. या ठिकाणी आम्ही तुम्हाला त्या स्मार्टफोनसंबंधी माहिती देत आहोत. जे फोन तुम्ही बेस्ट डिलमध्ये खरेदी करू शकता. या फोन्सवर तुम्हाला ७ हजार रुपयांपर्यंतची सूट मिळू शकणार आहे. ज्या फोन्सवर सूट मिळणार आहे त्या फोनमध्ये सॅमसंग गॅलेक्सी नोट १० लाईट, सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप, ओप्पो रेनो ३ प्रो, ओप्पो एफ१५, ओप्पो रेना २ एफ या स्मार्टफोनचा समावेश आहे. टॉप स्मार्टफोन कंपन्यांनी आपल्या या फोनवर किती सूट दिली आहे. किंवा या फोनची खास वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, यासंबंधीची सविस्त माहिती जाऊन घ्या...

सॅमसंगने या फोनला या वर्षीच्या सुरुवातीला लाँचिंग केले होते. या फोनला ४१ हजार ९९९ रुपयांत लाँच केले होते. परंतु, आता हा फोन स्वस्त केला आहे. या फोनच्या किंमतीत ४ हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. या सूटनंतर हा फोन ग्राहकांना ३७ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. ६ जीबी रॅम सोबत येणाऱ्या या फोनमध्ये जबरदस्त कॅमेरा सेटअप आणि फ्लॅगशीप Exynos प्रोसेसर देण्यात आला आहे.

क्लॅमेशेल डिझाईनचा सॅमसंगचा हा फोन फोल्डेबल फोन आहे. या फोनवर ७ हजार रुपयांची सूट मिळत आहे. या फोनची किंमत १ लाख १५ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, या सूट नंतर हा फोन ग्राहकांना १ लाख ८ हजार ९९९ रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८५५ प्लस प्रोसेसर सोबत येतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या या फोनमध्ये 3,300mAh ची बॅटरी दिली आहे.

ओप्पोच्या या फोनवर सुद्धा २ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. या सूटनंतर या फोनची किंमत ३१ हजार ९९० रुपयांवरून कमी होऊन २९ हजार ९९० रुपये झाली आहे. अमोलेड डिस्प्ले आणि फुल एचडी रिझॉल्यूशन सोबत येणाऱ्या या फोनमध्ये ८ जीबी रॅम देण्यात आला आहे. फोन १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज या पर्यायात येतो. फोन मीडिया टेक हीलियो प्रोसेसर सोबत येतो. तसेच या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. फोन सेल्फीसाठी या फोनमध्ये ४४ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स दिला आहे.

ओप्पो F15 फोनवर आता १ हजार रुपयांच्या सूटसह खरेदी करता येवू शकतो. डिस्काउंटनंतर या फोनची किंमत १९ हजार ९९० रुपयां ऐवजी १८ हजार ९९० रुपये झाली आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम सोबत मीडिया टेक हीलियो पी ७० प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहे. ज्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ६.४ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. ओप्पोचा फोन १ हजार रुपयांनी स्वस्तात खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.

ओप्पो रेनो टू एफ ओप्पो रेनो 2F या फोनच्या किंमतीत २ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. या फोनला आता २५ हजार ९९० रुपयांऐवजी २३ हजार ९९० रुपयांत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. डिझाईनमध्ये हा मिड रेंज फोन खूप प्रीमियम दिसतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनमध्ये तुम्हाला मीडियाटेक हीलियो पी ७० प्रोसेसर मिळणार आहे.



from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3f5KXjD