मुंबई: अभिनेता याच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्नांना तोंड फुटलं आहे. त्यानं खरंच आत्महत्या केली त्याचा मर्डर झालाय? अशा प्रकारच्या चर्चा सध्या सुरू आहेत.त्यामुळं या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी अनेकांनी केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुशांतच्या वडिलांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून सीबीआय चौकशीची मागणी केल्याचे ट्विट व्हायरल होत आहेत. यावर सुशांतच्या कुटुंबियांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सुशांतच्या वडिलांचं म्हणजेच यांचं कोणतही ट्विटर अकाऊंट नाही. त्याच्या नावानं व्हायरल होणारं ट्विट खोटं असल्याचं सुशांतच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे. सुशांतनं आत्महत्या केल्यानंतर त्याच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला. सुशांतच्या जाण्यानं त्याच्या कुटुंबीयावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परंतु अद्याप आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीची मागणी केली नसून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ट्विटचा आमचा काहीच संबंध नाही,असं सुशांतच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे. २७ तारखेला आम्ही एक पत्रक जारी करून आमच्या भावना व्यक्त केल्यात, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. २७ जून रोजी एक पत्रक त्याच्या कुटुंबियांकडून जारी करण्यात आलं होतं. सुशांतच्या कुटुंबीयांनी बिहार येथील पाटणामधील त्याच्या घराचं स्मारकात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनी सुशांतसिंह राजपूत फाऊंडेशनची स्थापना केली आहे. त्यांतर्गत त्याचं पाटण्यातील राजीव नगरमधील घराचं स्मारकात रुपांतर करण्यात येणार आहे. या स्मारकात आम्ही सुशांतच्या संग्रहातील वस्तू ठेवू. त्याची पुस्तकं, टेलिस्कोप आणि फ्लाईट सिम्युलेटर्स सह अनेक गोष्टी त्यात ठेवण्यात येईल. त्याच्या चाहत्यांसाठी या वस्तू पाहण्याकरिता खुल्या असतील, असंही त्यांनी म्हटलंय. तसेच, सुशांतच्या नावानं काढलेल्या या संस्थेद्वारे क्रीडा, सिनेमा आणि विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना पाठबळ देण्यात येणार असल्याचंही त्याच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. सुशांत जगासाठी सुशांतसिंह राजपूत होता. पण आमच्यासाठी तो फक्त गुलशन होता. तो खूप बोलका, मनमोकळा आणि स्वतंत्र विचारसरणीचा होता. काही तरी करून दाखवण्याची त्याच्यात ऊर्मी होती. त्यानं जे स्वप्न पाहिलं, त्याच स्वप्नांचा त्यानं मनापासून पाठलागही केला, असं त्याच्या कुटुंबीयांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सुशांतसिंहने १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. बराचवेळ दरवाजा वाजवूनही त्याने दरवाजा न उघडल्याने त्याच्या नोकराने घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला. सुशांत हा गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता, त्याच्यावर मनोविकार तज्ज्ञाकडून उपचारही सुरू होते, असं सूत्रांनी सांगितलं. टीव्ही अभिनेता म्हणून करियरची सुरुवात करणाऱ्या सुशांतनं मोठ्या संघर्षानंतर बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2C6Eq9M