Full Width(True/False)

३३७ अॅप्समध्ये 'धोकादायक' व्हायरस, बॅंकिंग डेटा चोरीची शक्यता

नवी दिल्लीः देशाची सायबर सिक्योरिटी एजन्सी CERT-In ने ब्लॅकरॉक (BlackRock) नावाचा एक नवीन अँड्रॉयड मेलवेयरला एक इशारा जारी केला आहे. हे मेलवेयर युजर्संचा बँकिंग आणि अन्य महत्त्वपूर्ण डेटा चोरी करण्यात सक्षम आहे. कम्प्यूटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडिया (CERT-In) ने आपल्या इशाऱ्यात म्हटले की मेलवेयर ईमेल, ई कॉमर्स, सोशल मीडिया सह ३०० हून अधिक अॅप्सच्या माध्यमातून लॉगिन क्रेडेंशियल (यूजरनेम आणि पासवर्ड) आणि क्रेडिट कार्डची माहिती चोरी करू शकतो. वाचाः 'ट्रोजन' कॅटेगरीतील हे मेलवेयर जगभरातील लोकांना आपले लक्ष्य करीत आहेत. या वर्षी मे महिन्यात समोर आलेल्या BlackRock मेलवेयरशी संबंधित एक रिपोर्ट ThreatFabric ने या महिन्यात जारी केली होती. त्यावेळी सुद्धा वाचकांना या मेलवेयरशी संबंधीत माहिती वाचकांना दिली होती. वाचाः सीआरटी-इन च्या इशाऱ्यानंतर डेटा चोरण्यात क्षमता असलेल्या अँड्रॉयड मेलवेयर मोठ्या संख्येत अँड्रॉयड अॅप्सवरून लक्ष्य केले जाते. या मेलवेयरला Xerxes बँकिंग मेलवेयर च्या सोर्स कोडचा वापर करुन तयार करण्यात आले आहे. जे स्वतः LokiBot अँड्रॉयड ट्रोजन च्या रुपात आहे. या मेलवेयर चे लक्ष्य बँकिंग आणि फायनान्शियल, नॉन फायनान्शियल अॅप्स, सोशल, कम्यूनिकेशन, नेटवर्किंग आणि डेटिंगचे प्रसिद्ध अॅप्ससह ३३७ अॅप्सचा समावेश आहे. वाचाः या प्रमाणे करतात काम मेलवेयर युजरच्या डिव्हाईसमध्ये येतात. आपली आयकॉनला अॅप ड्रॉअरने लपवतात. त्यानंतर नकली गुगल अपडेटच्या रुपाने युजरला परमिनशन मागतात. युजरची परवानगी मिळताच ते युजरच्या परमिनशन विना आपल्या मर्जीने काम करायला सुरवात करतात. वाचाः एजन्सीने म्हटले की, मेलवेयरच्या मदतीने हॅकर्स कॉन्टॅक्ट लिस्टला स्कॅन करणे, मेलवेयर ला डिफॉल्ट एसएमएस मॅनेजर सेट करणे, सिस्टम नोटिफिकिशन ला सीटू (कमांड व कंट्रोल) सर्वरवर पाठवणे, डिव्हाईस होम स्क्रीला लॉक करणे, नोटिफिकेशन आणि एसएमएस लपवणे व चोरी करण्यासारखे काम करतात. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33c0rQb