मुंबई- याआधी गायक सोनू निगम आणि गीतकार जावेद अख्तर यांनी लाउडस्पीकरवर मोठ्या आवाजात वाजणाऱ्या अजानवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काही महिन्यांपूर्वी यावर मोठा वादही झाला होता. आता प्रीतम सिंगने याबद्दल पुन्हा आवाज उठवला आहे. सोमवारी सकाळी त्याने फेसबुकवर एक पोस्ट लिहून मोठ्या आवाजात वाजवणाऱ्यांवर परखड शब्दात आपला राग व्यक्त केला आहे. प्रितमने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, 'एकाच जागी चार मशिदी आहे. यातून सकाळी ५ वाजता अजानचा आवाज येतो. कोण किती जोरात अजाण वाजवणार अशी यांच्यातच स्पर्धा सुरू आहे. आता नक्की कोणाचा आवाज अल्लाहपर्यंत जाणार हा विचार करण्याचा मुद्दा आहे.. तुम्हीही यावर विचार करा आणि मीही करतो.. गुड मॉर्निंग सबका मालिक एक..' याआधी जावेद अख्तर यांनीही लाउडस्पीकरवर वाजवल्या जाणाऱ्या अजानवर वक्तव्य केलं होतं. अख्तरांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, 'जवळपास ५० वर्ष लाउडस्पीकरवर अजाण गाणं चुकीचं मानलं जायचं. पण हळूहळू हे योग्य होऊ लागलं. आता या गोष्टी संपतच नाहीयेत. अजाणमुळे लोकांना होणारा त्रास पाहून हे बंद केलं जाईल अशी अपेक्षा आहे.' जावेद अख्तरांच्या या ट्वीटवरून त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. एवढंच नाही तर २०१७ मध्ये सोनू निगमनेही यासंबंधी ट्वीट केलं होतं. यात त्याने लिहिले होते की, 'भगवंत सर्वांची काळजी घेवो.. मी मुसलमान नाही.. तरीही मला अजाणच्या आवाजाने सकाळी उठावं लागतं. ही लादलेली धार्मिकता भारतात कधी संपणार? आणि मोहम्मद यांनी जेव्हा इस्लाम बनवला होता तेव्हा वीजही नव्हती. एडिसननतर मला हा कर्कश आवाज का ऐकावा लागत आहे? मी कोणत्याही मंदिर, गुरुद्वाऱ्याला मानत नाही. मग धर्मावर विश्वास नसणाऱ्या लोकांना उठवण्यासाठी विजेचा वापर का करता.. फक्त गुंडाराज सुरू आहे...' दरम्यान, याआधीही प्रितमने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने लिहिले होते की, 'पॅण्डेमिकच्या या स्थितीत अनेक लोक चिंताग्रस्त आहेत. मी त्यातलाच एक आहे. माझ्याकडे रेडिओचा अनुभव आहे. एक अभिनेता म्हणूनही चांगला अनुभव आहे. पण आता माझ्याकडे नोकरी नाहीये. सहा महिन्यांपूर्वी मी रेडिओची नोकरी सोडली. अभिनेता म्हणून मला स्वतःला एक संधी द्यायची होती. टीव्हीमधील शोचं सूत्रसंचालन करताना इतर अनेक चांगली कामं करत होतो. पण अचानक हा करोना व्हायरस आला आणि सर्व गणितं बदलून गेली.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2WeXFoN