Full Width(True/False)

नवाज- राधिकाचा जबरदस्त अभिनय सोडवणार 'मिस्ट्री'

मुंबई- नेटफ्लिक्सने गुरुवारी १६ जुलै रोजी १७ सिनेमांची घोषणा केली होती. याच सिनेमांपैकी एक सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमात आणि ची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सिनेमाची कथा पोलीस अधिकारी जटील यादवच्या भोवती फिरते जो एका हत्येचा तपास करत असतो. एका बड्या नेत्याच्या हत्येची चौकशी करण्यासाठी त्याची नियुक्ती करण्यात येते. हनी त्रेहन दिग्दर्शित या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि राधिका आपटेसह आदित्य श्रीवास्तव, श्वेता त्रिपाठी, इला अरुण, खालिद तैय्यबजी, शिवानी रघुवंशी आणि तिग्मांशू धूलिया यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक म्हणाला की, 'क्राइम थ्रिलर हा प्रकार नेहमीच मला आवडतो. मला आयुष्याच्या जवळ नेणाऱ्या कथा दिग्दर्शित करण्यात आनंद मिळतो. रात अकेली है या सिनेमाच्या बाबतीतही असंच काहीसं झालं.' जटील यादव व्यक्तिरेखेबद्दल बोलताना नवाज म्हणाला की, 'हा सिनेमा तुम्हाला स्वतःकडे ओढून घेतो आणि आपल्यासोबत पुढे घेऊन जातो. या सिनेमात मी एका पोलीस अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारत आहे. जटीलला महिलांशी कसं बोलायचं हे फारसं माहीत नसतं. तो नेहमी न्यायाच्या शोधात असतो आणि जोवर न्याय मिळत नाही तोवर तो शांत बसत नाही.' याशिवाय राधिका आपटेने आपल्या भूमिकेबद्दल सांगताना म्हटलं की, ''रात अकेली है' सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. हे एका अर्थाने घरी परतण्यासारखंच आहे. हा एक क्राइम थ्रिलर सिनेमा आहे. यात मी राधाची भूमिका साकारत आहे. मृत पाहिलेल्या नेत्याची ती नवविवाहित वधू असते. ती रागीट आणि उद्धट असते.' येत्या ३१ जुलैला हा सिनेमा ऑनलाइन प्रदर्शित होणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/399fiLZ