Full Width(True/False)

आलिया , रणबीरपेक्षा चांगले कलाकार बॉलिवूडमध्ये शोधून दाखवा; दिग्दर्शकाचा सवाल

मुंबई: अभिनेता याच्या धक्कादायक आत्महत्येनंतर बॉलिवूडमधली घराणेशाही, नवोदित कलाकारांना नाकारली जाणारी संधी यावरुन वाद उफाळून आला. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंग सुरू झालं. बॉलिवूडमधील स्टार किड्सवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. यात सर्वाधिक लक्ष केलं जातंय ते निर्माता करण जोहर, अभिनेता सलमान खान, अभिनेत्री आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा आणि सोनम कपूर आणि रणबीर कपूर यांना. बॉलिवूडमधल्या या घराणेशाहीच्या मुद्द्यावर दिग्दर्शक यांनी स्टार किड्सचं समर्थन केलं आहे. स्टार किड्सला ट्रोल करणाऱ्या आणि त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना बाल्की यांनी सुनावलं आहे. घराणेशाहीवर चर्चा करणं हेच मुर्खपणाचं आहे. प्रत्येक क्षेत्रात हेच सुरु आहे. अंबानी असोत किंवा बजाज, महिंद्रा या सर्वांच्या वडिलांनी त्यांचा उद्योग त्यांच्या मुलांच्याच हातात दिलाय.धीरूभाई अंबानी यांनी मुकेश आणि अनिल अंबानी यांच्या व्यतिरिक्त कोणाला ही जबाबदारी देता येईल का? असा विचार केला का? इतकंच नव्हे तर भाजी विक्रेता देखील त्याच्या व्यापार त्याच्या मुलाकडंच सोपवतो', असं बाल्की म्हणाले. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार किड्स आणि कलाकार आहेत, त्यांच्यासाठी घराणेशाही शब्द वापरणं चुकीचं आहे, असंही बाल्की यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे. स्टार किड्संना काही प्रमाणात फायदा होतो, पण त्यांच्यापुढं देखील अनेक आव्हानं असतात. स्टार किड्स असण्याचे तोटे देखील अनेक आहेत, असं बाल्की म्हणतात. इतकंच नव्हे तर बॉलिवूडमध्ये यांच्यापेक्षा चांगले कलाकार आहेत का? शोधून दाखवाच... असल्यास आपण ही घराणेशाहीची चर्चा पुन्हा सुरू करू असं म्हणत त्यांनी स्टार किड्सवर होत असलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. तसंच आलियाच्या अभिनयाचं कौतुक करण्याऐवजी तिला घराणेशाहच्या मुद्द्यावरून ट्रोल केलं जात आहे, हे चुकीचं असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान,घराणेशाही विरोधातील संतापाचा सर्वाधिक फटका बसलाय तो अभिनेत्री आलिया भट्टला. तिचे तब्बल चार लाख ४४ हजार फॉलोअर्स कमी झाले आहेत. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री सोनम कपूरच्या बाबतीत घडला आहे. तिचे ८४ हजार फॉलोअर्स कमी झाले आहेत. शेवटी कमेंट सेक्शन बंद करण्याची वेळ तिच्यावर आली. तर दुसरीकडे त्यांना विरोध करणाऱ्या कंगनाचे फॉलोअर्स मात्र वाढत आहेत. सध्या ती उघडपणे घराणेशाहीला लक्ष्य करत व्यक्त होते आहे. कंगनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर काही तासांमध्ये तिचे तब्बल १२ लाख फॉलोअर्स वाढले. यापूर्वी तिचे २० लाख फॉलोअर्स होते. आता ३२ लाख लोक तिला फॉलो करत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3h3nboU