Full Width(True/False)

आता चायनीज स्मार्टफोन ब्रँड्ससाठी बॅड न्यूज, घ्या जाणून

नवी दिल्लीः भारत सरकारकडून ५९ चायनीज अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. आता चायनीज स्मार्टफोन्स ब्रँड्ससाठी बॅड न्यूज आली आहे. पहिल्यांदा चायनीज स्मार्टफोन ब्रँड्सच्या एकूण विक्रीत घसरण पाहायला मिळू शकते. , काउंटरपॉइंट रिसर्च आणि Canalys च्या रिसर्चर्सच्या माहितीनुसार, एप्रिल-जून मधील तिमाहीत कंपन्यांना नुकसान पाहायला मिळू शकते. वाचाः मार्केट ट्रॅकर्सने यासाठी सोशल मीडियावरील चीन विरोधी मोहिमेला जबाबदार धरले आहे. यासाठी चायनीज ब्रँड्सला सप्लाय चेनला फटका बसला आहे. तसेच लॉकडाऊन मधील इंडियन प्लांट्समधील उत्पादन आधीच बंद झाले आहे. त्यामुळे चायनीज ब्रँड्स आधी प्रमाणे रोल करू शकले नाही. मार्केट शेअर घसरण्याची शक्यता शाओमी, ओप्पो, विवो, रियलमी आणि वनप्लस यासारख्या चायनीज ब्रँड्सचे एकूण मार्केट शेअर जानेवारी-मार्चच्या तिमाहिीत ८० टक्क्यांहून जास्त पोहोचले होते. इंडस्ट्रीच्या अनेक वरिष्ठांचे म्हणणे आहे की, दुसऱ्या तिमाही दरम्यान मार्केट ब्रँड्सच्या परफॉरमन्सवर परिणाम होत आहे. कंपन्यांचे मार्केट शेअर ५ ते ९ टक्क्यांपर्यंत कमी होवू शकते. तसेच सोशल मीडियावर बहिष्कार चायना या ट्रेंड करण्याबरोबर चायनीज डिव्हाईसेज खरेदी करण्याआधी दोनदा विचार करतील. वाचाः या ब्रँड्सची स्थिती चांगली आयडीसी इंडिया रिसर्चचे संचालक नवकेंदर सिंह यांनी सांगितले की, आता पर्यंत आलेल्या डिटेल्सची माहितीनुसार, तिमाहीत सॅमसंगची ग्रोथ चांगली राहू शकते. तसेच चायनीज हँडसेट्सच्या सेलची विक्री कमी पाहायला मिळू शकते. ऑनलाइन शिवाय ऑफलाइन मार्केटमध्ये सुद्धा घसरण पाहायला मिळू सकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dW78az