मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणामुळं नेहमची चर्चेत असते. सध्या करिनाच्या एका टीव्ही जाहिरातीमुळं सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. विशेष म्हणजे या जाहिरातीत करिनासोबत तिची नवरा देखील आहे. दोघांची ही जाहिरात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून नेटकऱ्यांनी मीम्स व्हायरल केले आहेत. खरं तर स्क्रिनवर करिना आणि सैफला एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. या जाहिरातीच्या निमित्तानं सैफीना एकत्र आले असले तरी चाहत्यांना देखील ही जाहिरात फार आवडली नाहीए. या जाहिरातीतल संवाद हा नेटकऱ्यांना मजेशीर वाटत असून याची खिल्ली उडवली जात आहे. दोघंही एक कॅन्डल लाइट डिनर करताना दिसत आहेत. जेवत असताना या दोघांमधील संवाद नेटकऱ्यांना हसवतोय. आपण खूप दिवस झालं एकत्र काही कामंच केलं नाही, असं सैफी करिनाला म्हणतो. यावर करिना म्हणते घरी पण रोमान्स आणि बाहेर पण तेच.यावर सैफ करिनाला म्हणतो की, आपण एका पाण्याच्या टाकीच्या जाहिरातीत काम केलं पाहिजे. दोघंही हसतात आणि जाहिरात संपते...अशी ही जाहीरात पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाहीए. सैफ आणि करिनाला अशी वेळ का आली की आता पाण्याच्या टाकीची जाहीरात करावी लागत आहे, असा प्रश्न नेटकरी विचात आहेत. तसंच इतक्या छान डिनर डेटवर सैफीना पाण्याच्या टाकीबद्दल बोलताना पाहून नेटकऱ्यांकडून जोक्स व्हायरल केले जात आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32xV5hz