Full Width(True/False)

गेमिंगची आवड असेल तर हे आहेत अधिक कॅपॅसिटीचे ६००० mAh बॅटरीने सुसज्ज स्मार्टफोन्स, पाहा लिस्ट

गेमिंगच्या या युगात प्रत्येकाला आपल्या फोनची बॅटरी मजबूत असावी असे वाटते आणि म्हणूनचबरेचदा नवीन स्मार्टफोन खरेदी करताना लोक पहिली गोष्ट विचारतात ती म्हणजे फोनची बॅटरी. म्हणूनच स्मार्टफोन कंपन्या देखील आग्रह करतात की युजर्सना कमी किंमतीत अधिक बॅटरी क्षमतेचे फोन उपलब्ध करून द्यावेत. अलिकडच्या काळात, असे अनेक फोन भारतात लाँच करण्यात आले आहेत जे ६०००mAh बॅटरीने सुसज्ज आहेत. त्यात जर तुम्हाला गेमिंगची आवड असेल पण स्मार्टफोनची बॅटरी सतत संपत असेल तर एक चांगली मजबूत बॅटरी असलेला फोन खरेदी करणे हाच एक पर्याय आहे. तुम्ही देखील याच विचारात असाल तर ही विशेष माहिती तुमच्यासाठीच. या स्मार्टफोन्सवर एक नजर टाकूया आणि जाणून घेऊया त्यामध्ये मजबूत बॅटरीशिवाय इतर कोणती वैशिष्ट्ये समाविष्ट आहे आणि या स्मार्टफोन्सची किंमत किती आहे.

गेमिंगच्या या युगात प्रत्येकाला आपल्या फोनची बॅटरी मजबूत असावी असे वाटते आणि म्हणूनच बरेचदा नवीन स्मार्टफोन खरेदी करताना लोक पहिली गोष्ट विचारतात ती म्हणजे फोनची बॅटरी. म्हणूनच स्मार्टफोन कंपन्या देखील आग्रह करतात की युजर्सना कमी किंमतीत अधिक बॅटरी क्षमतेचे फोन उपलब्ध करून द्यावेत. अलिकडच्या काळात, असे अनेक फोन भारतात लाँच करण्यात आले आहेत जे ६०००mAh बॅटरीने सुसज्ज आहेत. त्यात जर तुम्हाला गेमिंगची आवड असेल पण स्मार्टफोनची बॅटरी सतत संपत असेल तर एक चांगली मजबूत बॅटरी असलेला फोन खरेदी करणे हाच एक पर्याय आहे. तुम्ही देखील याच विचारात असाल तर ही विशेष माहिती तुमच्यासाठीच. या स्मार्टफोन्सवर एक नजर टाकूया आणि जाणून घेऊया त्यामध्ये मजबूत बॅटरीशिवाय इतर कोणती वैशिष्ट्ये समाविष्ट आहे आणि या स्मार्टफोन्सची किंमत किती आहे.

गेमिंगची आवड असेल तर हे आहेत अधिक कॅपॅसिटीचे ६००० mAh बॅटरीने सुसज्ज स्मार्टफोन्स, पाहा लिस्ट

गेमिंगच्या या युगात प्रत्येकाला आपल्या फोनची बॅटरी मजबूत असावी असे वाटते आणि म्हणूनचबरेचदा नवीन स्मार्टफोन खरेदी करताना लोक पहिली गोष्ट विचारतात ती म्हणजे फोनची बॅटरी. म्हणूनच स्मार्टफोन कंपन्या देखील आग्रह करतात की युजर्सना कमी किंमतीत अधिक बॅटरी क्षमतेचे फोन उपलब्ध करून द्यावेत. अलिकडच्या काळात, असे अनेक फोन भारतात लाँच करण्यात आले आहेत जे ६०००mAh बॅटरीने सुसज्ज आहेत. त्यात जर तुम्हाला गेमिंगची आवड असेल पण स्मार्टफोनची बॅटरी सतत संपत असेल तर एक चांगली मजबूत बॅटरी असलेला फोन खरेदी करणे हाच एक पर्याय आहे. तुम्ही देखील याच विचारात असाल तर ही विशेष माहिती तुमच्यासाठीच. या स्मार्टफोन्सवर एक नजर टाकूया आणि जाणून घेऊया त्यामध्ये मजबूत बॅटरीशिवाय इतर कोणती वैशिष्ट्ये समाविष्ट आहे आणि या स्मार्टफोन्सची किंमत किती आहे.

Tecno Spark 7T
Tecno Spark 7T

या Tecno स्मार्टफोनमध्ये ६.५२ इंचाचा IPS HD Plus डिस्प्ले आहे. फोन MediaTek Helio G35 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात ४ जीबी रॅमसह ६४ जीबी स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने देखील वाढवता येते. यात ४८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे तर ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी फोन मध्ये ६००० mAh ची मजबूत बॅटरी देण्यात आली आहे. जर तुम्हाला गेमिंगची आवड असेल तर हा फोन तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. या फोनची किंमत ९,२९९ रुपयांपर्यंत आहे.

Samsung Galaxy F22
Samsung Galaxy F22

या स्मार्टफोनमध्ये ६.४ इंच एचडी + सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्यूशन ७००x१६०० पिक्सेल आहे. हा फोन अँड्रॉइड ११ आधारित वन यूआय ३.१ वर काम करतो. मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने त्याचे स्टोरेज १ टीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफीसाठी, सॅमसंग गॅलेक्सी एफ 22 फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये ६००० mAh ची मजबूत बॅटरी आहे, जी २५ डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फोनची किंमत १२,९९९ आहे.

POCO M3 5G
POCO M3 5G

Poco M3 Pro 5G मध्ये ६. ५० इंच डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन १०८०x२४०० पिक्सेल आहे. हा फोन अँड्रॉइड ११ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यात ६GB रॅम आणि १२८GB इंटरनल स्टोरेज आहे, जे १TB पर्यंत वाढवता येते. Poco M3 Pro 5G मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याशिवाय फोनमध्ये २ मेगापिक्सेल मॅक्रो आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेन्सर उपलब्ध आहे. तुम्ही हा फोन १५,९९९ रुपयांना घरी आणू शकता.

Samsung Galaxy F62
Samsung Galaxy F62

या फोनमध्ये ६.७ इंच सुपर OLED डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy F 62 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्राथमिक, १३ मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड आणि २ मेगापिक्सेलचा मॅक्रो, २ मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंट पॅनलवर पंच-होल कट-आउट डिझाईन देण्यात आले आहे. शक्तीसाठी, यात ७००० mAh ची मोठी आणि मजबूत बॅटरी आहे. फोनची किंमत १९,९९९ रुपये आहे.

Infinix Hot 10S
Infinix Hot 10S

Infinix Hot 10S स्मार्टफोनमध्ये ६.८२ इंच HD + IPS डिस्प्ले आहे. हा फोन अँड्रॉइड ११ आधारित XOS ७.६ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. Infinix Hot 10S मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी, Infinix Hot 10S मध्ये ६००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी १०W चार्जिंग सपोर्टसह येते. फोनची किंमत १०,९९९ रुपये आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yiadg6