मुंबई:गेल्या साडेतीन महिन्यांपासून मराठी मालिकांचे जुने भाग पाहून प्रेक्षकांनीही कंटाळा आला आहे. आता शूटिंग सुरू झाल्यानंतर नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मालिकेत काही बदल झाल्याचंही प्रेक्षकांना दिसतंय. अल्पावधीच लोकप्रिय झालेली मालिका ' ' या मालिकेतही असे काही बदल प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. परंतु या मालिकेतील पात्रांची सोशल मीडियावर प्रचंड खिल्ली उडवली जात आहे. प्रेक्षकांचं प्रेम मिळत असलं तरी मालिकेला ट्रोल करणारा वर्गही मोठा आहे. अशाच एका व्हायरल मीम्सवर मालिकेतील अभिनेते यांनी संताप व्यक्त केलाय. फेसबुक वरच्या एका युजरनं‘अग्गंबाई सासूबाई’वर एक फोटो शेअर करत मालिकेतील संवादाची खिल्ली उडवली . या युजरची ही पोस्ट वाचून यांचा पारा चढला आणि त्यांनी रिप्लाय देत राग व्यक्त केला. आम्ही तुमच्या मालिकेला प्रसिद्धीच मिळवून देतोय, आता आम्हाला पार्टी पाहिजे आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये खुर्च्या देखील राखीव हव्यात,असं त्या युजरनं म्हटल्यानंतर गिरीश यांनी या युजरला चांगलंच सुनावलं आहे.‘तुमचा वेळ जातोय नं? मग झालं तर, वर पार्टी राखीव खुर्च्या म्हणजे जरा जास्तच होतंय. उलट तुम्हीच आमचे आभार मानले पाहिजेत. काहीही (बुद्धिही)खर्च न करता वेळ जातोय तुमचा. तुमच्या ह्या मनोरंजनाच्या खाद्याकरता आम्हाला जिवावर उदार होऊन रोज शूटला बाहेर पडावं लागतंय,’ अशी एक कमेंट गिरीश ओक यांनी केली. गिरीश ओक यांनी अशी कमेंट केल्यानंतर ही पोस्ट बरीच व्हायरल झाली आहे. काही जणांनी गिरीश ओक यांना ट्रोल करण्याचाही प्रयत्न केलाय. दरम्यान,'' मालिकेत प्रेक्षकांना एक नवा ट्विट पाहायला मिळणार आहे. मालिकेत पात्र तिच असणार आहेत. पण त्यांचं कधीही न पाहिलेलं रुप आता प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. मालिकेत आसावरीचा वेगळाच अवतार प्रेक्षक यापुढं पाहणार आहेत.नेहमीच सोहमच्या चुकींवर पांघरुण घालणाऱ्या आसावरी आता सासूच्या भुमिकेतून सुनबाईच्या आईची होण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. नंतर टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणाचं काम पुन्हा सुरू झालं असलं तरी, मालिकेच्या युनिटला चांगलीच धावपळ करावी लागतेय. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेचं शूटिंग ठाण्यात होऊ न शकल्यानं तो सेट ठाण्याहून नाशिकला हलवण्यात आला. तसंच ' ' या मालिकेचं चित्रीकरणदेखील आता कर्जतला होणार आहे. यापूर्वी या मालिकेचा सेट मीरा रोडमध्ये होता. पण, आता तो कर्जतच्या एका रिसॉर्टमध्ये हलवण्यात आला आहे. शूटिंग करताना सेटवर खूप खबरदारी घेतली जातेय.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39rpvDW