मुंबई- सिनेसृष्टीत आतापर्यंत घराणेशाहीबद्दल अनेकांनी आपली मतं मांडली आहेत. यात उद्योन्मुख गायक सिद्धार्थ स्लाथियानेही त्याचा अनुभव शेअर केला. स्वतः सोनू निगमने सिद्धार्थच्या नवीन गाण्याची प्रशंसा केली. सिद्धार्थ स्लाथियाच्या 'बेमायने' या गाण्याबद्दल सोनूने कौतुक केलं. अवघ्या तीन दिवसांमध्ये पाच लाखांहून अधिक व्ह्यूअर या गाण्यांना मिळाले आहेत. सोनू म्हणाला की, 'सिद्धार्थसारख्या प्रतिभावान कलाकारांची सध्या गरज आहे. माझ्या बहिणीने तिशा निगमने मला त्याची एक लिंक पाठवली आहे. त्याने जे विषय मांडले त्याच विषयांवर मी आतापर्यंत बोलत होतो. त्याच्याबद्दल ऐकन मलाही वाईट वाटलं. नवीन गायकांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे.' दरम्यान, सिद्धार्थ स्लाथियाने आपला अनुभव मांडताना म्हटलं की, 'सात वर्षांसाठी माझ्यासोबत टी-सीरिजने करार केला होता. पण मला कधीच काम मिळालं नाही. भूषण कुमार कामात व्यग्र असल्याचचं मला नेहमी सांगण्यात आलं. मला माझ्या कराराची कॉपीही कधी मिळाली नाही. काही महिन्यांनी मला कळालं की टी-सीरिज मिक्स टेप सीरिजवर काम करत आहे. यात माझ्यासाठीही एक गाणं आहे.' 'यानंतर मी दबंग शो करायला हाँगकाँगला गेलो. भारतात परत आल्यानंतर टी-सीरिजमधून मला कोणताच मेसेज आला नाही. याशिवाय माझ्या मेसेजनाही त्यांनी उत्तर दिलं नाही. यानंतर मी मिक्स टेपचा ट्रेलर पाहिला. त्या प्रोजेक्टमधून मला वगळण्यात आलं होतं. या सर्व गोष्टींमुळे मला फार वाईट वाटलं होतं.' सिद्धार्थ स्लाथियाचं नुकतंच 'बेमायने' गाणं प्रदर्शित झालं. हे गाणं सिद्धार्थ स्लाथियाने कंपोज केलं असून ते सिंक रेकॉर्ड्सने सादर केले आहे. एक बीटवरील १० वेगवेगळ्या शैलींमध्ये 'तुम ही हो' या गाण्याचे कव्हर व्हर्जन गायल्यानंतर सिद्धार्थ प्रसिद्ध झाला. २०१६ मध्ये चैन्नईमध्ये 'सोशल मीडिया हिरो' हा किताबही मिळाला होता. तसेच अभिनय क्षेत्रात नवोदित कलाकारांना चटकन न मिळणारी संधी, बड्या कलाकारांचे स्टारपुत्र, स्टारकन्या यांचे होणारे लाड यावरुन बॉलिवूड सध्या व्यक्त होत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सिनेसंगीत क्षेत्रातही काही वेगळी परिस्थिती नसल्याचं सांगत गायक यानंही या वादात उडी घेतली आहे. ही कंपूशाही सिनेसंगीत क्षेत्रातही भिनली असल्याचं तो म्हणतोय. 'म्युझिक माफिया' असं नाव देऊन त्यानं केलेले आरोप इंडस्ट्रीत चर्चेचा विषय बनले आहेत. त्याच्या या आरोपांमुळे संगीतविश्वातील काही बड्या नावांचे धाबे दणाणले.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jDGrLN