Full Width(True/False)

पंकज त्रिपाठी यांनी केलं जान्हवी कपूरचं कौतुक; म्हणाले...

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा आगामी चित्रपट 'गुंजन सक्सेना' प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर भरपूर चर्चा आहे. लॉकडाउनमुळे थिएटर्स बंद असल्यानं हा सिनेमा कधी रिलीज होणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती पण, 'गुंजन सक्सेना' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्माता करण जोहरनं घेतलाय. विशेष म्हणजे हिच्या वडिलांच्या भूमिकेत अभिनेते असून त्यांनी जान्हवी कपूरचं कौतुक केलं आहे. एका मुलाखतीदरम्यान पंकज त्रिपाठी यांनी जान्हवीसोबत काम करतानाचा अनुभव शेअर केला आहे. तिच्या अभिनयासोबत समजूदरापणाबद्दलही त्यांनी जान्हवीचं कौतुक केलं आहे. सध्या घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत असून यावरंही त्यांनी भाष्य केलं. जान्हवी सेलिब्रिटी किड असली तरी ती तिचं काम प्रामाणिकपणे करते, तुम्ही कोणत्या घराण्यातून आलात यापेक्षा तुम्ही एक व्यक्ती म्हणून महत्त्वाच्या असतात, असंही ते म्हणाले. कारगिल युद्धात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या महिला वैमानिक लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर हा चित्रपट आहे.'गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल' या चित्रपटात जान्हवीसोबत अभिनेते पंकज त्रिपाठी, अंगद बेदी, विनीता कुमार आणि मानव विज ही कलाकार मंडळींच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. अंगद गुंजन यांच्या भावाची भूमिका साकातोय. तोही एक लष्कर अधिकारी आहे. पहिल्यांदाच तो लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्यानं कठोर प्रशिक्षण घेतलं. धावण्याच्या व्यायामाचं प्रशिक्षण घेण्यासाठी त्यानं खास प्रशिक्षकही नेमला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केलं आहे


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZVDi26