Full Width(True/False)

'तारक मेहता'तील 'माधवी'ची मुलगी आली बोर्डात

मुंबई- मालिकेत माधवीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सोनालिका जोशीच्या मुलीने सीबीएसईच्या १२ वीच्या परीक्षेत ९३ टक्के मिळवले. सोनालिकाने सोशल मीडियावर याचा आनंद व्यक्त केला. सोनालिकाने गुरुवारी इन्स्टाग्राम अकाउंटवर मुलीसोबतचा फोटो शेअर करत खास कॅप्शनही दिलं. 'तिची आई असण्याचा अभिमान आहे.. १२ वीचा निकाल... अशीच पुढे जा गुंडाबाबू.. माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्यासोबत आहे..' सोनिकाच्या मुलीशिवाय बालवीर मालिकेतील अभिनेत्री अनुष्का सेनला १२ वीच्या परीक्षेत ८९.४ टक्के गुण मिळाले. सोनालिका जोशीच्या कामाबद्दल सांगायचे झाले कर, लॉकडाउननंतर तारक मेहताच्या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. सोनालिकाने सेटवरून मेकअप आर्टिस्टसोबतचा फोटोही शेअर केला होता. लॉकडाउनमध्ये जवळपास ११५ दिवस तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचं चित्रीकरण बंद होतं. दिलीप जोशींपासून शैलेश लोढापर्यंत सर्वच कलाकार आपआपल्या घरी बसले होते. गेल्या १२ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. २८ जुलै २००८ मध्ये या मालिकेचा पहिला भाग प्रक्षेपित झाला होता. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेला १२ वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने विशेष भागाचं आयोजन केलं आहे. यासाठी दिशा वकानीशी बोलणी केल्याचं समजलं जातं. काही महिन्यांपूर्वी करोना व्हायरसमुळे माधवी भिडे अर्थात इमारत सील करण्यात आली होती. सोनालिका कांदिवली पूर्व येथे राहते. तिच्या इमारतीत एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने २७ मार्चपासून काही दिवसांसाठी तिची इमारत सील करण्यात आल्याची माहिती स्वतः सोनालिकाने दिली होती. याआधी याच कार्यक्रमातील 'बाघा'ची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारीया याचीही इमारत सील करण्यात आली होती. कांदिवलीतील त्याच्या इमारतीत ३ करोनाबाधित रुग्ण सापडले त्यामुळे १४ दिवसांसाठी त्याची संपूर्ण इमारत सील केली गेली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3h7AtAP