वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात सरळ निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट असताना आता आणखी एकाने आपली उमेदवारी जाहीर केली आहे. अमेरिकेचा सुप्रसिद्ध रॅपर आणि अभिनेत्री किम कार्दशियनचा पती कान्ये वेस्ट याने आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्याच्या या उमेदवारीला टेस्ला कंपनीचा सर्वेसर्वा एलन मस्कनेदेखील पाठिंबा दिला आहे. कान्ये वेस्ट हा विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा समर्थक समजला जातो. कान्ये वेस्टने ट्विटरवर लिहीले की, ईश्वराला पूर्ण विश्वास ठेवून अमेरिकेला दिलेले वचन समजून घ्यावं लागणार आहे. आपल्या सर्वांना भविष्याचा विचार करून निर्मिती करावी लागणार असल्याचे सांगत त्यांने निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. वेस्टने ट्विटरवर ही घोषणा केल्यानंतर काही वेळेतच हजारोजणांनी त्याला पाठिंबा दर्शवला. टेस्ला कंपनीचा सर्वेसर्वा एलन मस्कनेही कान्ये वेस्टला पाठिंबा दर्शवला. कान्ये वेस्ट या निवडणुकीला घेऊन किती गंभीर आहे, याचीही चर्चा सुरू आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. काही राज्यांतून अद्यापही अपक्ष निवडणूक लढवण्यासाठीची प्रक्रिया संपली नाही. वाचा: वाचा: मागील वर्षी कान्ये वेस्टने आपण २०२४ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले होते. कान्ये आणि त्याची पत्नी अभिनेत्री किम यांनी कैद्यांची सुटका आणि सरकारच्या लोकाभिमुख मोहिमांमध्ये सहभाग नोंदवला आहे. निवडणूक लढवण्यासाठी फेडरल निवडणूक आयोगाची औपचारिकता पूर्ण केली की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आली नाही. अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यात अनेक अडचणींचा सामना कान्येला करावा लागणार आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार जुलै महिन्यापासून करावा लागणार आहे. त्याशिवाय अमेरिकेच्या ५० राज्यांमध्ये आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियामध्ये बॅलेट पात्रता मिळवावी लागणार आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठिंब्याशिवाय निवडणुकीत सहभाग घेणे कान्ये वेस्टला कठीण जाणार आहे. वाचा: दरम्यान, देशातील डावे, लुटारू, प्रक्षोभक लोकांपासून मूल्यांचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. अमेरिकी स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणात ट्रम्प त्यांनी 'देशांतर्गत शत्रूं'वर निशाणा साधला. ट्रम्प यांनी पॅराट्रुपरच्या कवायती पाहिल्या, तसेच नागरिकांना अभिवादन केले. करोना साथीमध्ये आघाडीवर लढणारे वैद्यकीय कर्मचारी आणि इतर व्यक्तींचेही ट्रम्प यांनी कौतुक केले. देशाच्या इतिहासाचा सन्मान न ठेवणाऱ्यांवर त्यांनी टीकाही केली. 'मूलतत्त्ववादी डावे, अराजकीय लोक, प्रक्षोभक, लुटारू आणि आपण काय करतोय याची कल्पना नसलेल्या लोकांचा पराभव करण्याच्या प्रक्रियेत सध्या आम्ही आहोत. संतप्त जमावाला आम्ही आमचे पुतळे पाडू देणार नाही, इतिहास पुसू देणार नाही,' असे ट्रम्प म्हणाले. 'कोलंबसने १४९२मध्ये अमेरिकेचा शोध लावला. तेव्हापासून सुरू झालेल्या अमेरिकी जीवनपद्धतीचे संरक्षण आणि संवर्धन आम्ही करू,' असे ट्रम्प यांनी सांगितले. मात्र, भाषणामध्ये ट्रम्प यांनी करोना साथीत झालेल्या मृत्यूंचा उल्लेख केला नाही. अमेरिकेत करोनामुळे १ लाख ३० हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2NZEH0U