नवी दिल्लीः ऑनर ३० यूथ एडिशन फोन काही दिवसांपूर्वी लाँच करण्यात आला होता. हा फोन ऑनर ३० चे स्वस्त व्हर्जन आहे. आता कंपनीने फोनवर डिस्काउंट ऑफर करीत आहे. या डिस्काउंटनंतर फोनचा ६ जीबी प्लस १२८ जीबी मॉडलचा फोन २९ हजार ६३१ रुपयांत उपलब्ध होणार आहे. ८ जीबी प्लस १२८ जीबी स्टोरेजचा फोन ३१ हजार ७५२ रुपयात खरेदी करता येवू शकतो. तर ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजचा फोन ३४ हजार ९४१ रुपयांत खरेदी केला जावू शकतो. या सर्व मॉडल्सवर जवळपास २१०० रुपयांची सूट देण्यात येणार आहे. हा डिस्काउंट केवळ चीनमध्ये उपलब्ध आहे. भारतात या डिस्काउंटसंबंधी कोणतीही माहिती कंपनीने अद्याप दिली नाही. वाचाः ऑनर ३० सीरिजचा कॅमेरा Honor 30 सीरीजच्या स्मार्टफोन्सचे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे या फोनचा कॅमेरा आहे. ऑनर ३० च्या बॅकमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या मागे प्रायमरी कॅमेरा ४० मेगापिक्सलचा आहे. तसेच फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. वाचाः फोनमध्ये आहेत दमदार फीचर्स ड्युल सिमच्या Honor 30 फोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस (1,080x2,400 पिक्सल) होल-पंच डिस्प्ले दिला आहे. तसेच फोनमद्ये ९८५ प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये ८ जीबी रॅम देण्यात आला आहे. इनबिल्ट स्टोरेज २५६ जीबी पर्यंत दिला आहे. फोनचा क्वॉड कॅमेरा सेटअपमध्ये ४० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आणि शेवटी २ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा दिला आहे. वाचाः टेलिफोटो लेन्समध्ये तुम्हाला 5X ऑप्टिकल झूम, 10X हाइब्रिड झूम आणि 50X डिजिटल झूम मिळणार आहे. हॉनर ३० मध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. बॅटरीला ४० वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31NIIOb